झेडपी पदाधिकारी बदलाचे काहींना विस्मरण : मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला? 

सतेज पाटील यांचा विदेश दौरा व त्यानंतर आलेले अधिवेशन यामुळे पदाधिकारी बदलावर चर्चा झाली नाही.
Kolhapur Zilla Parishad will have a change of office bearers : Hasan Mushrif
Kolhapur Zilla Parishad will have a change of office bearers : Hasan Mushrif

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल होणार, हे आपणच आधाची जाहीर केले होते. त्यामुळे बदल होणारच. याबाबत लवकरच पालकमंत्री सतेज पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगतानाच काहींना विस्मरण झाल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (ता. 12 मार्च) येथे पत्रकार परिषदेत लगावला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेबाबतचा निर्णय मुश्रीफ आणि पाटील हेच घेतात. त्यामुळे विस्मरण नेमके कोणाला झाला आणि हा टोला त्यांनी कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनाच लगावला का? महाआघाडीतील नेत्यांना होता, अशी चर्चा पत्रकार परिषदेनंतर शहरात रंगली होती. 

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी सदस्य दररोज भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे नवनवीन चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर खरोखरच पदाधिकारी बदल होणार आहे का? अशी विचारणा मुश्रीफ यांना करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, "जानेवारीच सत्ता बदल होईल, असे सांगण्यात आले होते. दरम्यान सतेज पाटील यांचा विदेश दौरा व त्यानंतर आलेले अधिवेशन यामुळे पदाधिकारी बदलावर चर्चा झाली नाही. आता लवकरच चर्चा करून पदाधिकारी बदल केला जाईल. पदाधिकारी बदल होत असताना महाविकास आघाडीत सुसंवाद रहावा; आघाडी एकत्र रहावी, असेच आपले प्रयत्न राहतील.'' 

जिल्हा परिषद अध्यक्षपद कॉंग्रेस की राष्ट्रवादीला, यावर ते म्हणाले, ""ही सर्व चर्चा राजीनाम्यानंतर केली जाईल. पदाधिकारी निवडीवर मतभेद असणार नाहीत. सर्वजण मिळून याबाबतचा निर्णय घेतील.'' 


पदधिकारी बदलाशी गोकुळ, केडीसीचा संबंध नाही 

आगामी काळात गोकुळ दूध संघ तसेच केडीसी बॅंकेची निवडणूक आहे. त्यामुळेच पदाधिकारी बदलण्यास विलंब होत आहे का? असा प्रश्‍न केला असता, या निवडणुकांचा व पदाधिकारी बदलाचा काहीही संबंध नसल्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

बांधकाम परवानगी ग्रामपंचायत स्तरावर? 

ग्रामीण भागातील सुमारे 3200 चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना आता नगररचानाकारच्या परवानगीची गरज नाही. बांधकामची कागदपत्रे, लेआउट, मोजणी नकाशा व अनुषंगिक कागदपत्रे परवानाधारक अभियंत्यांचे पत्राने सादर केली तर ग्रामपंचायत शुल्क भरून परवानगी देणार आहे. प्रायोगिक तत्वावर दोन दिवसांत काही परवानग्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत दिल्या जातील, असे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच, बांधकाम शुल्कचा निर्णयही लवकरच येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com