गोकुळवर कुणाचे वर्चस्व; मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात कल समजणार

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अटीतटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Election Result gokul election counting started in kolhapur
Election Result gokul election counting started in kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अटीतटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मतदानानंतर आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली असून थोड्याच वेळात निवडणूकीचा कल स्पष्ट होईल. मतमोजणीदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून मतमोजणी परिसरात अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह कोल्हापूरातील मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही गटांकड़ून जोरदार प्रचार करण्यात आल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. आज कोणता गट बाजी मारणार, हे लवकरच समजेल. मतमोजणीला सुरूवात झाली असून दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधकांचेही या निवडणुकीवर लक्ष आहे.

मतमोजणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. केवळ मतमोजणी केंद्रापुरतेच स्पीकर लावण्यात आले आहेत. पास असणाऱ्यांनाच मतमोजणी केंद्राकडे सोडले जात आहे.  त्यामुळे मतमोजणी असूनही परिसरात मोठी शांतता आहे. 

मतमोजणीला राखीव गटापासून सुरु झाली आहे. तर, सर्वसाधारण गटाची मतमोजणी या सर्व गटांची मोजणी झाल्यानंतर केली जाणार आहे. इतर व राखीव गटातील मतांवरच एकूण निवडणुकीचा ट्रेंड समजेल. मतमोजणी करताना सर्वप्रथम प्राथमिक मतमोजणी होईल. झालेली मते व मतपत्रिकेंचा हिशेब केला जाईल. त्यानंतर मतदार संघनिहाय मतमोजणी होईल. एकूण 18 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीत 99.78 टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी 99.78 टक्के मतदान झाले आहे. एकूण 3647 ठरावदारांपैकी 3639 ठरावदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तीन ठरावदारांचा यापुर्वीच कोरोनाने मृत्यु झाला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्‍या तालुक्‍यात सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांत टोकाची इर्षा बघायला मिळाली. करवीर तालुक्‍यातील बारा मतदान केंद्रावर दुपारी 3.40 पर्यंत शंभर टक्के मतदान पूर्ण झाले होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com