देशमुखांचे कदमांना जशास तसे उत्तर : एक नगरसेवक पळवताच भाजपने काँग्रेसचे नऊ कार्यकर्ते फोडले 

भाजपही काँग्रेसला खिंडार पाडण्याचा तयारीत होते.
देशमुखांचे कदमांना जशास तसे उत्तर : एक नगरसेवक पळवताच भाजपने काँग्रेसचे नऊ कार्यकर्ते फोडले 
Congress Activist's from Yede join BJP

कडेगाव (जि. सांगली) : कडेगाव तालुक्यातील येडे येथील काँग्रेस पक्षाच्या नऊ कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे देशमुख यांनी हे प्रवेश करून राज्यमंत्री विश्वजित कदम यांना जशास तसे उत्तर दिले. (Congress Activist's from Yede join BJP)

कडेगाव नगरपंचायतीचे भाजपचे नगरसेवक नितीन शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर शिंदे यांचा काँग्रेसमध्ये झालेला पक्षप्रवेश भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे भाजपही काँग्रेसला खिंडार पाडण्याचा तयारीत होते. तर येडे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेवून भाजपने काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले असल्याचे बोलले जात आहे.
 
हेही वाचा : नोटीस मिळताच ७२ तासांत सर्व ट्विट डिलिट करून बिनशर्त माफी मागा 

संग्रामसिंह देशमुख म्हणाले,‘‘भाजप हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. या भाजपमध्ये कार्यकर्ता हाच पक्षाचा प्रमुख असल्याने कार्यकर्त्यांनी मनात संभ्रम न ठेवता पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. पक्षात योग्य वेळी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. केंद्रात भाजपची सत्ता असून आता राज्यातही लवकरच भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाला व कार्यकर्त्यांनाही अच्छे दिन येतील. त्यामुळेच आता भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. ’’

काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत असल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

याप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते सूर्यकांत अभंग, विशाल शिंदे, संकेत वाघमारे, तुषार काळेबाग, सूरज काळेबाग, दत्ता राक्षे, दीपक शिंदे, सुहास काळेबाग, राकेश बालके या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी केन अॅग्रोचे संचालक हणमंतराव कदम, रामचंद्र अभंग, चंद्रकांत बाबर, वैभव कदम, दत्ता घार्गे, अजित यादव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in