सांगलीतून भाजपचे देशमुख, पवारांना विक्रमी मताधिक्‍य देणार : आमदार गाडगीळ 

संग्रामसिंह देशमुख म्हणजे कामातून सिद्ध झालेले नेतृत्व आहे.
BJP candidate  Deshmukh, Pawar will give record majority from Sangli : MLA Gadgil
BJP candidate Deshmukh, Pawar will give record majority from Sangli : MLA Gadgil

सांगली : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होत आहे. सांगली विधानसभा मतदार संघातून पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षकचे उमेदवार जितेंद्र पवार यांना विक्रमी मताधिक्‍य देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. 

देशमुख आणि पवार यांच्या प्रचारार्थ आमदार गाडगीळ यांनी विविध ठिकाणी प्रचार दौरे केले. त्यावेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते. पदवीधर व शिक्षकची निवडणूक अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र प्रचाराचा जोरदार धडाका उडाला आहे. 

आमदार गाडगीळ यांनी अनेक ठिकाणचे प्रचार दौरे करताना स्वतः मतदारांच्या घरी जाऊन त्यांना प्रचारपत्रके देऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. बुधगाव, कुपवाड आणि अन्य गावांसह महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागात नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. 

पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोचून उल्लेखनीय काम केले आहे. एक अभ्यासू व धडपड्या अध्यक्ष म्हणून नावलौकिक मिळवला आहे. संग्रामसिंह देशमुख म्हणजे कामातून सिद्ध झालेले नेतृत्व आहे, असेही आमदार गाडगीळ यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आणि भाजपचे सर्व पदाधिकारी उद्या (ता.29 नोव्हेंबर) मतदारांपर्यंत पोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करून मतदान कशा पद्धतीने करायचे आहे, हे सांगणार आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com