अजितदादांकडून मंगळवेढ्यासाठी गुड न्यूज : बसवेश्‍वर स्मारकासाठी निधी मिळणार 

स्मारकाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
will provide to necessary funds for the memorial  Basaveshwar in Mangalwedha city: Ajit Pawar
will provide to necessary funds for the memorial Basaveshwar in Mangalwedha city: Ajit Pawar

मंगळवेढा : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंगळवेढा शहरातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी आवश्‍यक त्या निधीची तरतूद करण्यात येईल, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. 8 मार्च) सादर केलेल्या अर्थसंकल्पात म्हटले आहे. त्यामुळे स्मारकाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मंगळवेढा शहरात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. मागील फडणवीस सरकारच्या काळात याबाबत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती निश्‍चित करण्यात आली होती.

या समितीकडून कृषी खात्याची 35 एकर जागा निश्‍चित करून 100 फुटांची मूर्ती, स्मारक परिसरामध्ये ग्रंथालय, ध्यानकेंद्र, अभ्यास केंद्र स्मारक, कृषी पर्यटन स्थळ, भक्त निवास, शेतकरी निवास, महात्मा बसवेश्वर यांची माहिती देणारे फलक आदींचा समोवश असलेला आराखडा निश्‍चित करण्यात आला होता. 

या समितीने 151 कोटी खर्चाचा आराखडा बनवून तो सरकारला सादर केला होता. आमदार भारत भालके यांनी विधानसभेत याबाबत अनेक वेळा आवाजदेखील उठवला होता. परंतु मागील सरकारच्या काळात या स्मारकाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची, यावरून हा प्रस्ताव परत आला होता. नगरपालिकेने त्याबाबतचे पत्र दिले होते. परंतु ही जागा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने याबाबतची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्याकडे केली असल्याचे समजते. 

महाविकास आघाडी सरकारने महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केल्यामुळे भविष्यात पर्यटनाच्या संधी वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 

भारतनानांच्या प्रयत्नांना अखेर यश : भगिरथ भालके 

भारतनाना यांनी महात्मा बसवेश्वर व संत चोखोबा स्मारकासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने आज बसवेश्वर स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केली. चोखोबांच्या स्मारकाबरोबर अंतिम टप्प्यात असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील. नानांच्या प्रयत्नाला यश येईपर्यत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी सांगितले. 

आमदार भालके हे पहायला आज हवे होते : नगराध्यक्षा

आमदार भालके यांच्या प्रयत्नाला यश आले. पण, हे यश पहायला ते असायला हवे होते. ही खंत मनात असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवेढ्यावर लक्ष देत प्रलंबित प्रश्नाला न्याय दिल्याने लिंगायत बांधवांकडून आनंद होत आहे. स्मारकाचे काम झाल्यावर या परिसरात पर्यटनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नगरपालिकेच्या वतीने कामासाठी सर्व सहकार्य असणार आहे, असे मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी शब्द दिला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण स्मारकाबाबतची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांच्याकडून घेतली होती. त्यावेळीच तरतूद होण्याचे संकेत मिळाले होते. लवरकरच बसवेश्‍वर स्मारकास सुरुवात होईल. 

-अजित जगताप, सदस्य सोलापूर जिल्हा नियोजन मंडळ 

युती सरकारच्या काळात बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न रेंगाळला होता; परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आनंद झाला. दोन महिन्यांपूर्वी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून पाठपुरावा केला होता. या दोघांनी स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला.  -शैला गोडसे, शिवसेना नेत्या 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com