आमदार भारत भालकेंमुळेच विठ्ठल कारखाना सुरू झाला : जयंत पाटील 

आजारी असतानाही ते सतत मुंबईला येत होते. आम्ही त्यांना सांगत होतो. नाना काळजी घ्या.परंतु त्यांनी शेवटपर्यंत चिकाटी सोडली नाही.
Vitthal sugar factory started because of MLA Bharat Bhalke: Jayant Patil
Vitthal sugar factory started because of MLA Bharat Bhalke: Jayant Patil

पंढरपूर : मागील वर्षी बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार भारतनाना भालके यांनी खूप प्रयत्न केले. आजारी असतानाही ते सतत मुंबईला येत होते. आम्हीही त्यांना सांगत होतो. नाना काळजी घ्या. परंतु त्यांनी शेवटपर्यंत चिकाटी सोडली नाही. शेवटपर्यंत त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच विठ्ठल कारखान्याचे धुराडे पेटले. त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या हिताचे पाहिलें स्वप्न पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. 

आमदार भारत भालके यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी आज (ता. 30 नोव्हेंबर) सकाळी त्यांच्या सरकोली या गावी पार पडला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी आमदार भालके यांनी मतदार संघातील अनेक विकास कामांबरोबरच शेतकऱ्यांचा साखर कारखाना सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या अठवणी सांगितल्या. 

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की, "आमदार भालके यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्‍याचे फार मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचीदेखील हानी झाली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. कारखान्याला सरकारची थकहमी मिळत नसतानाही त्यांनी पवारसाहेबांना विनंती करून थकहमी देण्यास भाग पाडले.' 

भालके यांना शेतकऱ्यांबाबत खूपच तळमळ होती. मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी देखील खूप प्रयत्न केले. त्यांची दोन्ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून यापुढे प्रयत्न करू. त्यांची स्वप्नपूर्ती ही त्यांना श्रध्दांजली ठरेल, असे यांनी नमूद केले. 

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आमदार भारत भालके यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ताकद द्यावी अशी भवना व्यक्त केली. 

या वेळी माजी आमदार दीपक साळुंखे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उद्योजक उत्तमराव फडतरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, नागेश भोसले, किरण घाडगे, संदीप मांडवे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com