कोरोनाविरोधातील लढाईला गुरुजींचे पाठबळ : दहा लाखांचा निधी जमा  

कोरोनाच्या काळातशिक्षकांनी मदतीसाठी पुढे केलेला हात निश्चितच कौतुकास्पद आहे.
Teachers in Madha taluka raised Rs 10 lakh to buy corona material
Teachers in Madha taluka raised Rs 10 lakh to buy corona material

माढा (जि. सोलापूर) : कोरोनाविरोधात (Corona) लढण्यासाठी समाजातील सर्व घटक आपल्या परीने योगदान देत आहे. या लढाईस आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे (primary teacher) पाठबळ मिळणार आहे. कारण, सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या माढा (Madha) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील गुरुजनांनी दहा लाखांचा निधी (Ten lakh funds) जमा केला असून तो कोरोनावरील उपाय योजनांसाठी दिला जाणार आहे. (Teachers in Madha taluka raised Rs 10 lakh to buy corona material)

माढा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची संख्या जवळपास 950 इतकी आहे. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी ठोस निधी उभा करण्याची संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेस तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी साथ देत आत्तापर्यंत सुमारे साडेनऊ लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित पन्नास हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर एकूण दहा लाखांचा निधी हा माढा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्त केला जाणार आहे. 

याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांची व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठकही नुकतीच झाली आहे. शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढे केलेला हात निश्चितच कौतुकास्पद आहे. 

माढा तालुक्यातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाबरोबरच कोरोनाच्या काळामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कोरोनासंबंधी प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पडत आहेत. शिक्षकांनी आता सामाजिक बांधिलकी दाखवत जवळपास दहा लाखांचा निधी कोरोनासंबंधी करावयाच्या उपाय योजनांसाठी माढा तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून कोरोनाबाबत आरोग्य विभागाला उपयुक्त साधनसामुग्री, औषधे व इतर गोष्टी पंचायत समितीचे अधिकारी व शिक्षक प्रतिनिधी विचारविनिमय करून घेणार आहेत.

येत्या काही दिवसांतच दहा लाखांचा निधी आरोग्य विभागाकडे दिला जाणार आहे. माढा तालुक्यातील शिक्षकांनी घालून दिलेल्या या आदर्श उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com