सोलापूर ZP चे उपाध्यक्ष चव्हाण, सभापती मासाळ यांनी मंगळवेढ्यात सत्ता राखली 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे लतिफ तांबोळी यांच्या गाव विकास आघाडीने मरवडे ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली.
Solapur ZP vice president Chavan and sabhapati Masal held power in the gram panchayat
Solapur ZP vice president Chavan and sabhapati Masal held power in the gram panchayat

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेत्यांना आपल्या गावात वर्चस्व राखण्यात यश आले, तर दोन नेत्यांना सत्ता राखण्यात अपयश आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, सदस्य रमेश भांजे यांनी गावातील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश आले. जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते गटाला अपयश आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे लतिफ तांबोळी यांच्या गाव विकास आघाडीने मरवडे ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. येथील पवार गटाला सत्ता राखण्यात अपयश आले आहे. 

तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतीच्या सुमारे 186 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (ता. 18 जानेवारी) शासकीय गोदामामध्ये तहसीलदार स्वप्नील रावडे, नायब तहसीलदार सुधाकर माघाडे यांच्या नियोजनाखाली मतमोजणीस सुरूवात करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीचे निरीक्षक विठ्ठल जोशी यांनी मतमोजणीदरम्यान भेट दिली. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार करू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय पाटील, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहायक पोलिस भगवान बुरसे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या सलगर बुद्रूक व पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हुलजंती गावातील लढत लक्षवेधी बनले होती. परंतु या दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व गावात अबाधित राखले आहे. चव्हाण यांच्या गटाने ग्रामपंचायतीच्या सर्वच सर्व जागा जिंकल्या आहेत, तर सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हुलजंती गावात अकराच्या अकरा जागा जिंकून त्यांनीही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बालाजीनगर येथील दोन उमेदवारांना 159 अशी समसमान मते पडली होती. मात्र, चिठ्ठीत श्रीकांत चव्हाण हे विजयी झाले. 

मरवडे येथे सत्ताधारी गटाला विरोध करत स्थापन करण्यात आलेल्या गाव विकास आघाडीने आठ जागेवर वर्चस्व मिळवित ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. लवंगी ग्रामपंचायतीवर भालके गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार हे डोणज ग्रामपंचायतीवर विजयी झालेले आहेत. 

नंदेश्वर ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती दादा गरंडे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर ममदाबाद (शे.) येथे समविचारी तरुणांनी एकत्र येत स्थापन करण्यात आलेल्या गाव आघाडीने सत्ता मिळविली आहे. सिद्धापूर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बापूराव चौगुले यांनी अकरा पैकी सहा जागा घेत वर्चस्व कायम ठेवले आहे. लेंडवे चिंचाळे, तांडोर, अरळी येथील विजयी उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com