शिवसेनेचे दिग्विजय बागल या कारणासाठी शरद पवारांना भेटणार 

अतिरिक्त पाण्यासाठी परवानगीच कशी मिळू शकते?
Shiv Sena's Digvijay Bagal will soon meet Sharad Pawar for this reason
Shiv Sena's Digvijay Bagal will soon meet Sharad Pawar for this reason

करमाळा (जि. सोलापूर) : सांडपाणी ह्या गोंडस नावाखाली उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूरला पळवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. उजनी धरणाच्या पूर्ण पाण्याचे वाटप झाले असताना इंदापूरला अतिरिक्त पाण्यासाठी परवानगीच कशी मिळू शकते? असा प्रश्न मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी केला.

दरम्यान, या प्रश्नासंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून इंदापूरला देण्यात येणारे 5 टीएमसी पाण्याचा निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करणार आहे, असेही बागल यांनी या वेळी सांगितले. 

उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे, त्यापैकी ६४ टीएमसी मृत साठा (अचल) व ५३ टीएमसी वापरातील पाणीसाठा (चल) आहे. वापरातील पाणी साठ्याचेच वाटप केले जाते. पण आतापर्यंत उजनी धरणाचे ५४ नाहीतर ८० टीएमसी पाण्याचे वाटप झालेले आहे. म्हणजेच मृत साठ्यामधीलही काही पाण्याचे वाटप हे हया आधी झालेले आहे, त्यामुळे अतिरिक्त पाणी वाटपास आमचा विरोध आहे, असे दिग्विजय बागल यांनी सांगितले.

अधिकारी वर्गाच्या चुकीच्या माहितीमुळे सरकार दरबारी असे चुकीचे निर्णय घेतले जातात. उजनी धरणामध्ये इंदापूर तालुक्याचे पण योगदान आहे; परंतु त्यांना आधीच योग्य ते पाण्याचे वाटप झालेले आहे. आज उजनी धरण पूर्ण होऊन ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी प्रकल्पग्रस्तांना तेथील पायाभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन करावी लागत आहेत. उजनी धरणाचे पाणी इतरत्र नेण्याआधी उजनी धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना मदत करावी. त्यांना विश्वासात घेऊन कोणतेही निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी बागल यांनी बोलताना केली.

सोलापूर जिल्ह्यात २०१६ मे मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्यास सुरुवात झाली असताना उजनी धरणामधून एक टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यावेळी शेतकऱ्यांची पिक वाचली होती, असेही शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com