महाआघाडीला फुटीचे ग्रहण; शिवसेनेच्या शैला गोडसेंनी भरला पंढरपुरातून अर्ज 

आमदार होण्यासाठी शैला गोडसे यांनी 2009 पासून तयारी सुरू केली आहे.
Shiv Sena Solapur District Women's Front chief Shaila Godse filed nomination papers from Pandharpur
Shiv Sena Solapur District Women's Front chief Shaila Godse filed nomination papers from Pandharpur

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. कारण, महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीप्रमुख शैला गोडसे यांनी शुक्रवारी (ता. 26 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्‍यता सुरुवातीच्या काळात वाटत होती. मात्र, या पोटनिवडणुकीसाठी अनेकांनी दंड थोपटले आहेत. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात नवीन राजकीय समीकरण पुढे येऊन महाविकास आघाडी अस्तित्वात आली. पण, राज्यातील सत्ता स्थापनेनंतर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका व जिल्हा परिषदेमध्येही महाआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्यात आली. 

भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, त्यामुळे पंढरपूर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा हा नैसर्गिक आहे. शिवसेना व मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करणे अपेक्षित असतानाच शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

आमदार होण्यासाठी शैला गोडसे यांनी 2009 पासून तयारी सुरू केली आहे, त्यासाठी त्यांनी मंगळवेढ्याच्या पाणी आंदोलनात सहभाग घेऊन शिरनांदगी व नंदेश्वर येथे आंदोलन केले. याशिवाय तालुक्‍यातील रस्ते, उजनी धरणातून आणि म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्यासाठी आंदोलन केले. याशिवाय इतरही कार्यक्रमात सहभाग घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्या उमेदवारीच्या दावेदार बनत गेल्या. 

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात 2019 मध्ये ही जागा भाजपकडे गेल्याने त्यांना निवडणूक आखाड्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांना आमदारकीची निवडणूक लढवता आली नाही. सध्या महाविकास आघाडीचा विचार करता ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. तरीही शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदावरील शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक समीकरणाची सुरुवात पंढरीतील झाली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेचे उमेदवार अर्ज दाखल केल्यामुळे त्याचे पडसाद राज्यात उमटणार का? याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. 


हेही वाचा : अधिकाऱ्यांच्या मदतीने सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न : सतेज पाटील 

कोल्हापूर : आम्ही सत्तेवर येणारच आहोत, बहुमत आम्ही सिद्ध करणारच आहोत, हा भारतीय जनता पक्षाचा दावा अधिकाऱ्यांच्या जीवावर केला जात होतो, हे आता सिद्ध झाले आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करून भाजप सत्तेत येण्याचा प्रयत्न करत होते. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही सत्तेच्या माध्यमातून अधिकारी बळी पडत आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षाने बहुमताने जे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे, त्यामध्ये भाजपने बिघाडी आणण्यापेक्षा विरोधी पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका निभवावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. 

पाटील म्हणाले, गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल बाहेर आला. हा अहवाल विरोधी पक्षनेते पत्रकार परिषदेमध्ये दाखवतात, हे खूपच वाईट आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने असा प्रकार घातक आहे. विरोध पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांनी ही गोपनीयता पाळायला हवी होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com