शिवसेना पदाधिकारी म्हणतात, तानाजी सावंतांना आता तरी सक्रिय करा  - Shiv Sena office bearers says, activate Tanaji Sawant now | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना पदाधिकारी म्हणतात, तानाजी सावंतांना आता तरी सक्रिय करा 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला.

करमाळा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख, माजी मंत्री आमदार डॉ. तानाजी सावंत यांना सक्रीय करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे आणि करमाळ्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड यांनी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शिवसेनेतील आलेली मरगळ दूर करण्यासाठी, तसेच शिवसेना पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांना पुन्हा पक्षवाढीसाठी सक्रिय करावे.

करमाळा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तत्कालीन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना तिकीट न देता रश्मी बागल यांना विधानसभेचे तिकीट दिले होते, त्यामुळे शिवसेनेत ऐन विधानसभा निवडणुकीत दोन गट निर्माण झाले होता, त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला.

आता जुन्या व नव्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन तसेच, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना आपसातील मतभेद बाजूला ठेवून शिवसेना हाच माझा गट व पक्ष या माध्यमातून एकत्र आणून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी आमदार सावंत यांना जिल्हासंपर्कप्रमुखपदी पुन्हा सक्रिय करावे, अशी मागणी करमाळा शहर आणि तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मागणी आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख