समाधान आवताडेंना मिळणार लग्नाच्या वाढदिवशी आमदारकीची भेट?

आज त्यांचा लग्नाचा वाढदिवसआहे.
Samadhan Avtade will get MLA's gift on his wedding anniversary :
Samadhan Avtade will get MLA's gift on his wedding anniversary :

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. आज (ता. २ मे ) त्यांच्या लग्नाच्या वाढदिवस असून त्यांना या दिवशी आमदारकीची भेट मिळणार, या चर्चा मंगळवेढ्यात सुरू आहे. दरम्यान, आघाडीवर असलेल्या समाधान आवताडे यांच्या समर्थकांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच गुलालाची उधळण केली आहे.

राज्यात होत असलेल्या एकमेव पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व  महाविकास आघाडीच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे कोरोनाचे संकटात असतानादेखील वरिष्ठ पातळीवरील नेते मोठ्या ताकदीने प्रचाराच्या रणधुमाळीत उतरून आपापल्या भूमिका मतदारांना पटवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण, अतिशय चुरशीच्या झालेल्या मतमोजणीत मताधिक्याची आकडेवारी कमी जास्त असली तरी सोशल मीडियात मात्र चुकीची आकडेवारी व्हायरल केली जात होती. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. 

मतमोजणीच्या 31 व्या फेरीअखेर समाधान आवताडे हे पाच हजार 958 मताने आघाडीवर आहेत, त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या मंगळवेढा येथील कार्यालयासमोर गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस असून या निमित्ताने त्यांना आज लग्नाच्या वाढदिवसाची भेट आमदारकीच्या रुपाने मिळणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट होत आले आहे. आता त्यांना विजयाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : पंढरपुरात आवताडेंना आघाडी मिळवून देत आमदार परिचारकांनी ‘करून दाखवलं’


मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या जाहीर सभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारास मी पंढरपुरातून रोखतो, तुम्ही मंगळवेढ्यातून समाधान आवताडे यांना लीड द्या, कसं आतवाडे आमदार होणार नाही, हे बघूच, असे आवाहन दिले होते. पोटनिवडणुकीच्या प्रचारसभांत आमदार परिचारक यांनी दिलेला शब्दा खरा करून दाखविला आहे. कारण पंढरपूर तालुक्यातून त्यांनी आवताडे यांना ९०० मतांची आघाडी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पंढरपूर रोखण्यात यशस्वी ते ठरले आहेत.

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार प्रशांत परिचारक व संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यामध्ये एकी घडवून आणली होती. त्याच वेळी त्यांनी बेरजेचे राजकारण करत परिचारक यांची मोठी ताकद आवताडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केली होती. एकत्र लढलो तर ही जागा ताब्यात घेण्यात आपण यशस्वी होऊ, या इच्छेने दोघांचे मनोमिलन करत आवताडेना संधी दिली होती. 

मतदारसंघात प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी मतदारांना मोठे मालक (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांची शपथ घातली होती, त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द आणि घातलेली शपथ सार्थकी लागत जवळपास १७ व्या फेरीअखेर मताधिक्य देण्यात आमदार परिचारक यशस्वी ठरले आहेत. ह्या सर्व फेऱ्या या पंढरपूर तालुक्यातील झालेल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरमध्ये परिचारक यांचे प्राबल्य कायम राहिले आहे. सुरूवातीला काही फेऱ्यापासून आवताडे यांना मताधिक्य मिळवून देण्यात परिचारक यशस्वी ठरत राहिले पंढरपूर शहरातदेखील त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले. 

विशेष म्हणजे गेल्या विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत स्वःत सुधाकरपंत परिचारक उमेदवार असूनसुद्धा त्यांना पंढरपूर तालुका आणि शहरात भारत भालके यांनी आघाडी घेतली होती. ती गेल्या वेळच्या ६००० मतांची आघाडी अवघ्या दीड वर्षांत कापून त्या ठिकाणी आवताडे यांना ९०० मतांची आघाडी मिळवून देण्यात परिचारक यांनी यश मिळवले आहे. या मताधिक्याच्या यशामुळे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात परिचारक यांचे वजन वाढणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com