पराभवाचे दुःख बाजूला ठेवून भगिरथ भालके पुन्हा लागले कामाला

भालके यांनी पुन्हा लढण्याची तयारी सुरु केली की काय?अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Putting aside the grief of defeat, Bhagirath Bhalke resumed work
Putting aside the grief of defeat, Bhagirath Bhalke resumed work

मंगळवेढा : पंढरपूर पोटनिवडणुकीतील (Pandharpur Byelection) पराभवाचे दुःख कुरवळत न बसता राष्ट्रवादीचे भगिरथ भालके  (Bhagirath Bhalke) यांनी आपल्या जनसेवेच्या दैनंदिन कामाकाजाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा लोकांना मदतीचा हात मिळावा, यासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत पात्र तरुणांना शासकीय अनुदानावर वाहने उपलब्ध करून देण्यासाठी भालके यांनी पुढाकार घेतला आहे. निकालानंतर पुन्हा तातडीने लोकांच्या सेवेत उतरत आपण मैदान सोडून जाणार नसल्याचा संदेश भालके यांनी विरोधकांना दिला आहे. (Putting aside the grief of defeat, Bhagirath Bhalke resumed work)

कोरोना संकटात अनेकांचे रोजगार व व्यवसाय बुडाले आहेत. अशा लोकांना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टाटा आणि महिंद्रा कंपनीच्या गाड्या शासकीय अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी पुढाकार घेतला. 

हेही वाचा : मराठा समाजाच्या हिताचा निर्णय आता राज्य पातळीवर व्हावा  ः रोहित पवार
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी  ७ मेपर्यंत अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या रणधुमाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मतदानानंतर त्याबाबत सर्वच राजकीय पक्षांवर नागरिकांतून टीकेची झोड उठवली गेली. सध्या निवडणुकीचा धुराळा शांत झाला आहे, त्यामुळे प्रत्येकांना रोजीरोटी  आणि जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केले. त्याचवेळी ‘माझा व्यवसाय; माझा हक्क’ या संकल्पनेतून सरकारने छोट्या व्यवसायिकांना फिरून व्यवसाय करण्यास परवानगी दिली. त्यामध्ये कृषीविषयक वाहतूक, फळभाज्या, चाट, नाश्ता, जेवण यांसह विविध खाद्यपदार्थ विक्री करता येणार आहे. त्यातून त्यांना आर्थिकदृष्टीने बळकट होण्यास मदत होणार आहे. 

पात्र व्यक्तीला वाहन खरेदीसाठी  ९ ते ९. ५ टक्के दराने बँकांचे कर्ज उपलब्ध होणार असून २५ ते ३५ टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे. या टेपोंतून आपल्या पसंतीचा कोणताही व्यवसाय करता येणार आहे. त्याबाबत संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन भालके यांनी केले आहे. 

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भगिरथ भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्याकडून तीन हजार 733 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर नाराज न होता दुसऱ्या दिवशीपासून ते मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. दरम्यान, निकालानंतर त्यांनी आमदार प्रशांत परिचारकांवर टीकेची झोड उडवली होती. दंड थोपटायचे असेल तर 2024 ला आपल्या समोर येण्याचे आव्हानदेखील त्यांनी दिले आहे, त्यामुळे सध्या नवीन शासकीय योजना राबविण्याच्या माध्यमातून भालके यांनी पुन्हा लढण्याची तयारी सुरु केली की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com