सोरतापवाडीत तब्बल 60 वर्षांनंतर सत्तांतर : भाजपच्या सुदर्शन चौधरी गटाची पिछेहाट

चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात 60 वर्षांनंतर विरोधकांना यश आले आहे.
In the power of Soratapwadi Gram Panchayat Changes after 60 years
In the power of Soratapwadi Gram Panchayat Changes after 60 years

उरुळी कांचन (जि. पुणे) ः भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या पूर्व हवेलीतील सोरतापवाडी ग्रामपंचायतीत तब्बल सहा दशकानंतर सत्तांतर घडले. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात 60 वर्षांनंतर विरोधकांना यश आले आहे. 

राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्‍य रामदास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडीने पंधरापैकी आठ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीच्या सत्तेवर कब्जा मिळविला आहे. 

विद्यमान सरपंच सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाई के. डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. 

सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या पंधरा जागा असून, सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाई के.डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल तर राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्‍य रामदास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडी यांच्यात सरळ लढत झाली. तीन जागा बिनविरोध झाल्याने, निवडणूक झालेल्या अकरा जागांपैकी भाई के. डी. चौधरी पुरोगामी पॅनेलला 4 जागा मिळाल्या. सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला. 

सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व पुरस्कृत शिवशंभो ग्रामविकास आघाडीची प्रचाराची यंत्रणा राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रामदास चौधरी , बाळासाहेब चोरघे व सोनबा चौधरी यांनी सांभाळून निकालात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

पॅनेलनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :- प्रभाग क्रमांक 1- शंकर ज्ञानोबा कड, सुप्रिया देवेंद्र चौधरी, रविंद्र मोहन गायकवाड (सोरतापेश्वर पॅनेल). प्रभाग क्र.2- विलास शंकर चौधरी, स्नेहल विठ्ठल चौधरी, सुनिता कारभारी चौधरी (भाई के.डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल). प्रभाग क्रमांक 3- निलेश विठ्ठल खटाटे ,पुनम नवनाथ चौधरी (शिवशंभो आघाडी), अश्विनी चंद्रकांत शेलार (पुरोगामी पॅनेल). प्रभाग क्रमांक 4- विजय सर्जेराव चौधरी, मनिषा नवनाथ चौधरी, सोनाली नागनाथ लोंढे (पुरोगामी पॅनेल). प्रभाग क्रमांक 5- सुरज उर्फ सनी पोपट चौधरी, संध्या अमित चौधरी व शशिकांत दशरथ भालेराव (सोरतापेश्वर पॅनेल). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com