धोत्रेकरांनी ग्रामपंचायत दिली माजी सैनिकांच्या ताब्यात आणि आमदार राऊत म्हणाले... 

सैन्यातीलकडक शिस्तीनुसार काटेकोर कारभार करावा.
Power of ex-soldiers over Dhotre Gram Panchayat in Barshi taluka
Power of ex-soldiers over Dhotre Gram Panchayat in Barshi taluka

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील धोत्रे (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांनी देशासमोर वेगळाच आदर्श ठेवला आहे. ग्रामपंचायतीची सत्ता बिनविरोध करून माजी सैनिकांच्या हातात दिली आहे. सैन्यातील प्रशासनाप्रमाणे कडक शिस्तीनुसार काटेकोर कारभार करावा आणि 15 लाख रुपयांचा आमदार निधी प्रथम तुम्हालाच दिला जाईल, असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले. 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धोत्रे ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड झालेले सचिन डांगे, शालन घोडके, नंदा सुरवसे, सुमंत जाधवर, गणेश मोरे, उल्लतब्बी शेख, वंदना जाधवर, मंगल जाधवर, बुवासाहेब बोकेफोडे या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी आमदार राऊत बोलत होते. जेथे महिला आरक्षण आहे, तिथे सर्व गावकऱ्यांनी मिळून माजी सैनिकांच्या पत्नीला संधी देण्यात आली आहे. 

"सर्व पक्षाच्या हितचिंतकाचे, गावच्या एकीचे आभार मानले पाहिजेत. खामगाव, धोत्रे, कुसळंब, धानोरे ही बंद पडलेली पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यन्वित करू. साठवण तलाव, जामगाव-धोत्रे रस्ता पूर्ण केला जाईल,'' असे आश्वासनही आमदार राऊत यांनी नूतन सदस्यांना दिले. 

प्रास्तविकात धोत्रीचे ग्रामस्थ हमीद पठाण म्हणाले, "धोत्रे ग्रामपंचायतीची स्थापना 1956 मध्ये झाली. आत्तापर्यंत ग्रामपंचायतीच्या बारा निवडणुका झाल्या. गावातील तंटे संपले पाहिजेत, या साठी जय जवान-जय किसान पॅनेलची स्थापना केली. गावात 33 माजी सैनिक असून 35 जण सध्या लष्करात कार्यरत आहेत. गावातील 68 जण देशाची सेवा करीत असल्याचा ग्रामस्थांना अभिमान आहे, त्यामुळे गावची सेवा करण्याची संधी माजी सैनिकांच्या हातात दिली आहे.'' 

नूतन सदस्य माजी सैनिक सुमंत जाधवर म्हणाले, "ग्रामस्थांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्‍वासला तडा जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. गाव डिजीटल करायचे आहे; पण मोबाईल रेंज नाही, त्यामुळे गावात मोबाईल टॉवर उभा करण्याचा प्रथम प्रयत्न करणार आहे. आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालय, पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com