परिचारक गटाचा भालके-काळे गटाच्या सदस्यांवर आक्षेप 

सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीत संबंधित दोन सदस्यांना भाग घेण्यास बंदी घालण्यात यावी.
Paricharak group objects to Bhalke-Kale group members voting in Sarpanch elections
Paricharak group objects to Bhalke-Kale group members voting in Sarpanch elections

पंढरपूर : पंढरपूर तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 26 फेब्रुवारी) सरपंच आणि उपसरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. सोनके गावातही ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक गटाने कल्याण काळे आणि भालके गटाच्या दोन सदस्यांना मतदान करण्यास मज्जाव करण्याची मागणी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

दरम्यान, आजच्या बैठकीत सरपंच आणि उपसरपंच निवडीचा विषय आहे. तुमचा विषय आमच्या अखत्यारित येत नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आमदार परिचारक गटाला सांगितले. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यात भालके-काळे गटाच्या सारिका चंदनशिवे यांची सरपंचपदी, तर उमा मेटकरी यांची उपसरपंचपदी बहुमताने निवड झाली. 

निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयावर पारिचारक गटाने सांगितले की या प्रकरणी आम्ही विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहोत. 

पंढरपूर तालुक्‍यातील सोनके ग्रामपंचायत ही 11 सदस्यांची आहे. पंचवार्षिक निवडणुकीत कल्याण काळे- भारत भालके पॅनेलचे 6 सदस्य निवडून आले आहेत, तर भाजपप्रणित आमदार प्रशांत परिचारक पॅनेलचे 5 सदस्य निवडून आले आहेत. 

काळे - भालके पॅनेलमधील एक सदस्याचे वय हे ग्रामपंचायत सदस्यासाठी पात्र नाही, तर दुसऱ्या सदस्याने विहिरीसाठी शासकीय अनुदान घेतले आहे. मात्र, विहीरच खोदली नाही, अशी तक्रार भाजपप्रणित परिचारक पॅनेलने सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. 

त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीत संबंधित दोन सदस्यांना भाग घेण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आमदार परिचारक पॅनेलकडून सरपंच निवड करणारे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामुळे सोनके गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com