विरोधकांचा धुव्वा उडवत दिलीप वाल्हेकरांची चौथ्यांदा निर्विवाद सत्ता 

या निवडणुकीत वाल्हेकर यांच्या ताब्यातून सत्ता जाणार, अशी चर्चा निवडणुकीदरम्यान रंगली होती.
Dilip Walhekar's group's undisputed power over Alandi Mhatoba gram panchayat for the fourth time
Dilip Walhekar's group's undisputed power over Alandi Mhatoba gram panchayat for the fourth time

लोणी काळभोर (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या गटाने आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायतीवर तेरा विरुध्द शून्य अशा मोठ्या फरकाने चौथ्यांदा निर्विवाद सत्ता राखली आहे.

तेरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिलीप वाल्हेकर यांच्यासह अशोक जवळकर, भगवान जवळकर, लक्ष्मण भोंडवे, मोहन जवळकर, बाळासाहेब शिवरकर, सोमनाथ जवळकर यांच्या नेतृत्वाखील श्रीनाथ म्हातोबा ग्रामविकास पॅनेलने सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकत विरोधकांची बत्ती गुल केली आहे. विरोधकांच्या बहुचर्चित म्हातोबा जोगेश्वरी बहुजन ग्रामविकास पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. 

आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायतीवर वाल्हेकर यांच्या गटाची मागील 15 वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत म्हातोबा जोगेश्वरी बहुजन ग्रामविकास पॅनेल उभा केला होता. निवडणुकीपुर्वी दिलीप वाल्हेकर गटाच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर दहा जागांसाठी श्रीनाथ म्हातोबा ग्रामविकास पॅनेल व विरोधकांचा म्हातोबा जोगेश्वरी बहुजन ग्रामविकास पॅनेल यांच्यात सरळ लढत झाली. 

दिलीप वाल्हेकर यांच्या गटाच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्यासाठी गावातील अनेक मातब्बर नेते एकत्र आले होते. त्यामुळे या निवडणुकीत वाल्हेकर यांच्या ताब्यातून सत्ता जाणार, अशी चर्चा निवडणुकीदरम्यान रंगली होती. त्यातच पूर्व हवेलीतील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या ताब्यातील ग्रामपंचायती राखता न आल्याने वाल्हेकर यांचीही सत्ता जाणार अशा चर्चेला जोर चढला होता. मात्र, वाल्हेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेराही जागा मोठ्या फरकाने जिंकून विरोधकांना धोबीपछाड केल्याचे दिसून आले. 

श्रीनाथ म्हातोबा ग्रामविकास पॅनेलसाठी दिलीप वाल्हेकर यांच्यासह अशोक जवळकर, भगवान जवळकर,लक्ष्मण भोंडवे, मोहन जवळकर, बाळासाहेब शिवरकर, कैलास खटाटे, सोमनाथ जवळकर आदीनी प्रयत्न केले होते. 

नागरिकांचे हित लक्षात घेऊन काम करणार : वाल्हेकर 

विजयानंतर दिलीप वाल्हेकर म्हणाले, "आळंदी म्हातोबाचीसह पूर्व हवेलीतील सर्वच ग्रामपंचायतीवर मतदारांनी आमच्या पक्षाला संधी दिली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा सर्वांगिण विकास हेच अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमचे लोक काम करत आहेत. मागील 15 वर्षांच्या काळात विविध विकासकामे मार्गी लागल्याने मतदारांनी आम्हाला पुन्हा संधी दिली आहे. नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढील पाच वर्षे काम केले जाणार आहे.'' 

श्रीनाथ म्हातोबा ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः श्रीहरी काळभोर, स्वाती जवळकर, सुनीता जवळकर, पारस वाल्हेकर, सोनाली माकर, दयानंद शिवरकर, सुनीता शिंदे, उज्वला शिवरकर, विनायक जवळकर, सायली शिवरकर, मनीषा भोंडवे, सोनाली जवळकर, सखाराम थोरात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com