कारभाऱ्याला वाचविण्यासाठी पक्षांतर केलेल्या चित्राताईंनी एक काय ते ठरवावे - NCP state president Rupali Chakankar criticizes BJP state vice president Chitra Wagh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

कारभाऱ्याला वाचविण्यासाठी पक्षांतर केलेल्या चित्राताईंनी एक काय ते ठरवावे

हुकूम मुलाणी
बुधवार, 14 एप्रिल 2021

भारतनाना गेल्यानंतर भालके कुटुंबाच्या सांत्वनासाठी आल्यावर उमेदवार देणार नाही, असे म्हणणाऱ्या फडणवीसांनी उमेदवार दिला. 

मंगळवेढा : कारभारी गुन्ह्यात अडकल्यामुळे कातडी वाचविण्यासाठी पक्षांतर केलेल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाजपला मतदान करू नका म्हणायचे आणि पक्षांतर केल्यावर भाजपच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादीला मतदान करू नका म्हणायचे. ताई, एक काहीतरी ठरवा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या एकेकाळच्या सहकारी आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांना केले. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी  मंगळवेढ्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत चाकणकर बोलत होत्या. या वेळी मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, निरीक्षक भारती शेवाळे, दिपाली पांढरे ,अंजली मोरे, शलाका पाटील, सुवर्णा शिवपुरे, अरूणा दत्तू, नगरसेवक भाभी मकानदार, भागिरथी नागणे, राजश्री टाकणे, राजलक्ष्मी गायकवाड, सुनीता अवघडे, स्मिता अवघडे, प्रफुल्लता स्वामी, मंदाकिनी सावंजी, लता माळी,लता माने,पूनम घुले, यांच्यासह पक्षनेते अजित जगताप, विजय खवतोडे मुजम्मिल काझी ,प्रवीण खवतोडे, सोमनाथ माळी,दादा टाकणे, प्रवीण हजारे,बापू वाकडे, सोमनाथ बुरजे उपस्थित होते.
 
प्रदेशाध्यक्ष चाकणकर म्हणाल्या की, दुष्काळी भागातील भगिनीच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी लोकवर्गणीची अट्ट रद्द करून राज्य सरकारने पाणी योजना मार्गी लावली. स्व भारत नाना भालके हे अकाली गेले. त्यांची स्वप्नही त्यांच्याबरोबर गेले, म्हणणाऱ्यांना जनतेने नाकारलेले आहे. विरोधी पक्षाकडून डिपाझीट जप्त झालेले लोक या मतदारसंघात प्रचारसाठी आणले जात आहेत. भारतनाना गेल्यानंतर भालके कुटुंबाच्या सांत्वनासाठी आल्यावर उमेदवार देणार नाही, असे म्हणणाऱ्या फडणवीसांनी उमेदवार दिला. 

साम दंड भेद काही वापरा, हा विठ्ठलाचा महाराष्ट्र आहे. बिहार किंवा उत्तर प्रदेश नाही, बिहारच्या प्रचारात गेलेली हवा अजून डोक्यातून गेलेली नाही. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस पोचण्याऐवजी फक्त जाहिरातच घराघरांत पोचली. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात महाविकास आघाडी ज्या पद्धतीने काम करत आहेत, अशा संकटाच्या काळात विरोधकांनी सहकार्य करणे अपेक्षित होते. पण स्वतचा निधी पीएम केअरला देवून महाविकास आघाडी सरकारने काय केले, हे विचारायचे. मंदीर उघडा म्हणून टाळ आंदोलन करणाऱ्यांनी मंदीर सुरू झाल्यावर दर्शन तरी घेतले का, असा सवाल चाकणकर यांना या वेळी विचारला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख