लक्ष्मण ढोबळेंच्या पत्नीचा पराभव झालेल्या गटात राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

या गटाचा उमेदवार निश्चित करण्यात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
NCP starts preparations for elections in Huljanti Zilla Parishad group
NCP starts preparations for elections in Huljanti Zilla Parishad group

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा ढासळलेल्या बुरुज डागडुजी करण्याच्या दृष्टीने पक्षाने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर होण्याआधीच हुलजंती जिल्हा परिषद गटाची मोर्चेबांधणी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या भेटीतून सुरू झाली. (NCP starts preparations for elections in Huljanti Zilla Parishad group)

आजच्या भेटीत तीर्थक्षेत्र विकास निधीतून महालिंगराया मंदिर परिसराच्या विकासकामांबद्दल भेट असली तरी पडद्यामागील भेट राजकीय होती. गतवर्षीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नीचा आमदार समाधान आवताडे गटाच्या शीला शिवशरण यांनी जवळपास पाच हजार मतांनी पराभव केला होता. हा पराभव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला होता. त्यामुळे शीला शिवशरण यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीवर काम करण्याची संधी मिळाली होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मंगळवेढा तालुक्यासाठी मिळवला. 

सध्या निवडणूक जाहीर होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी उरला असताना या गटाचे सध्याचे आरक्षण राखीव महिला असे आहे, त्यामुळे नव्या आरक्षणाबरोबर नवीन राजकीय समीकरणे काय असणार, याची उत्सुकता लागली आहे. तत्पूर्वीच राष्ट्रवादीने हा जिल्हा परिषद गट ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची आज इंदापुरात इच्छुकांनी भेट घेऊन त्या संदर्भातील आखाडे स्पष्ट केले आहेत. तळसंगी येथील उद्योगपती हनुमंत दुधाळ उमेदवार म्हणून तयारीला लागले आहेत तर याच मतदार संघात राष्ट्रवादी ओबीसी सेलचे लतीफ तांबोळी यांनी मुलीचा वाढदिवस साजरा करून तेही इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हुलजंती जिल्हा परिषद गटात धनगर समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत, त्यामुळे हुलजंती व मरवडे पंचायत समिती गण याचा विचार करता तालुक्याच्या राजकीय पटलावर या गटात निवडणूक, आरक्षण आणि उमेदवार निश्चित नसतानादेखील ही घडामोड लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे या गटाचा उमेदवार निश्चित करण्यात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवाय हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यात पालकमंत्र्यांना यश येणार का हेदेखील पाहणे औत्सुक्य ठरणार आहे. 

इंदापूरच्या आजच्या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय पवार, उद्योजक हणमंतराव दुधाळ, उद्योजक कामानंद हेगडे, सुरेश पवार,  सरपंच कुरमुत्ते, गेना दोलतडे, प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार, रविंद्र शेणवे, विकास दुधाळ, राजू घोडके उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com