संजय राऊतांच्या अंगात आलं अन् राज्यात महाआघाडीचं सरकार आलं 

जे झालं ते चांगलंच झालं आहे.
Minister of State Vishwajit Kadam criticizes BJP
Minister of State Vishwajit Kadam criticizes BJP

सोलापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं अन् राज्यात महाविकास आघाडीचे सरकार झालं. त्यांच्या अंगात आलं ते बरंच झालं, असे विधान काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोलापुरात केले आहे. (Minister of State Vishwajit Kadam criticizes BJP)

राज्यमंत्री कदम हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शहर व जिल्हा कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची कॉंग्रेस भवनात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत, त्या आता घडतायत. महाविकास आघाडीचे सरकार हे संजय राऊत यांच्या अंगात आल्याने अस्तित्वात आलं आहे आणि जे झालं ते चांगलंच झालं आहे.

भाजपने खोटी व निकष लावून फसवी कर्जमाफी केली. पण, महाविकास आघाडीमध्ये माझ्याकडे सहकार व कृषी खाते असल्याने निकषात बदल करून कर्जमाफी दिली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला. भाजपवाले फसवे आहेत; म्हणूनच तीन पक्षांनी एकत्रित येऊन सर्वसामान्यांसाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री कदम पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना कॉंग्रेसने इंग्रजांना हाकलले, तर भाजप काय चीज आहे. त्यांनाही केंद्रातून पायउतार करू, आज रस्त्यावरील लढाईसोबत सोशल मीडियावरही लढाई लढायचे आहे. जिल्ह्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासारखे खंबीर आणि सक्षम नेतृत्व आहे. युवकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी स्वतःच्या हिमतीवर करून सत्ता काबीज करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, नगरसेवक चेतन नरोटे, शिवा बाटलीवाला, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन इनामदार, वैष्णवी करगुळे, नरसिंग कोळी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com