मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी थेट मोदींकडून निधी मिळवून देतो - The Mangalvedha Upsa Irrigation Scheme is funded by the Modi Government : Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी थेट मोदींकडून निधी मिळवून देतो

हुकूम मुलाणी
सोमवार, 12 एप्रिल 2021

त्यामुळे आम्हाला सभा घेण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी प्रत्येक निवडणुकीत कधी कागद, कधी पेन अशी वेगवेगळी आश्वासने दिली गेली. परंतु तुम्ही समाधान आवताडे यांना संधी द्या. राज्य सरकारने निधी नाही दिला, तर थेट मोदी सरकारकडून निधी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील जाहीर सभेत बोलताना दिले 
          
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले की महाराष्ट्रातील रखडलेल्या पाणी योजनेसाठी मोदी सरकारने पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तुमच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी तुम्ही समाधान आवताडे यांना संधी दिल्यानंतर आम्ही मोदी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, त्यासाठी तुम्ही अन्यायी, अत्याचारी, दुराचारी सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आवताडे यांना विजयी करावे,  कोरोनाच्या संकटात सभा घेण्याची आमची इच्छा नव्हती; परंतु विरोधी पक्षाचे नेते येऊन आमच्यावर मुक्ताफळे उधळून गेले आहेत, त्यामुळे आम्हाला सभा घेण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. 

‘‘शेतकऱ्यांना, गोरगरीब सामान्य जनतेला मदत करायला सरकारकडे पैसे नाहीत. मात्र, मुंबईतील बिल्डरांना मदत करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दारू विक्रेत्यांना सवलत देण्यात आली. मात्र, कोरोनाच्या संकट काळातसुद्धा शेतकऱ्यांकडून जवळपास पाच हजार कोटींची वीज बिले वसूल केले आहे. त्यामुळे या महावसुली सरकारमधील मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. मुंबई पोलिस दलाची बदनामी काही पोलिस अधिकाऱ्यांनी केली. कोरोनाच्या संकटात राष्ट्रवादीच्या नेत्याकडे रेमडेसिव्हीरचा साठा कुठून उपलब्ध झाला, याचा या निमित्ताने प्रश्न होतो, असे फडणवीस म्हणाले.

...तर माझे नाव बदला

मोगलाई मोगलांच्या काळात होती; परंतु आता लोकशाहीत ही वीजबिल वसुलीसाठी मोगलाई सुरू करत शेतकऱ्यांची वीजकनेक्शन तोडले जात आहे. पोटनिवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पुन्हा हे तोडणार. नाही तोडली तर माझं नाव बदला, असे जाहीर आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत आम्ही एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडले नाही. या सरकारने दुप्पट बिल देऊन वसुली केली. कोरोनाच्या काळात परिस्थिती खराब झाली; म्हणून मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटी विकास शुल्क माफ करण्यात आले. अतिवृष्टीच्या काळात आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली. हेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा बांधावर जाऊन 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या, असे सांगत होते. पण, त्यांनी हेक्टरी दहा हजार रुपये देखील मदत दिली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख