गोकुळचे रणांगण - चंदगड तालुक्यातून 'ते' दोन उमेदवार कोण?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यातून विद्यमान संचालक आमदार राजेश पाटील यांची विरोधी आघाडीतून तर दीपक पाटील यांची सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र यावर्षी बदललेले राजकीय संदर्भ आणि तालुक्याच्या वाट्याला आलेली दोन संचालक पदे विचारात घेता नवे दोन उमेदवार कोण असतील याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Gokul Dairy Elections on Cards
Gokul Dairy Elections on Cards

चंदगड : गोकुळ Gokul Milk दूध संघाच्या निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यातून विद्यमान संचालक आमदार राजेश पाटील यांची विरोधी आघाडीतून  तर दीपक पाटील यांची सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र यावर्षी बदललेले राजकीय Politics संदर्भ आणि तालुक्याच्या वाट्याला आलेली दोन संचालक पदे विचारात घेता नवे दोन उमेदवार कोण असतील याबाबत उत्सुकता वाढली आहे. Kolhapur Gokul Dairy Elections Politics Analysis 

गतवेळच्या निवडणुकीत आमदार पाटील व दीपक पाटील हे सत्तारूढ महाडिक आघाडीतून विजयी झाले होते. मात्र यावर्षी निवडणुकीचे राजकीय संदर्भ बदलले आहेत. महाडिक यांच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील Satej Patil, मंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushriff, खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांची आघाडी आहे. निवडणुकीला पक्षीय संदर्भ असल्यामुळे आमदार पाटील यांची उमेदवारी विरोधी आघाडीतून निश्चित आहे. तर दीपक पाटील यांची उमेदवारी सत्तारुढ महाडिक आघाडीतून असेल. 

जिल्ह्यात सर्वाधिक दररोज सुमारे 90 हजार लिटर दूध Milk संकलन असलेल्या या तालुक्याला सुरुवातीची वीस वर्षे संस्थेवर प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. तत्कालीन आमदार नरसिंगराव पाटील यांनी मारुती गणू कांबळे यांना प्रथम प्रतिनिधित्व दिले. त्यानंतर माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील गटाकडून महादेव कांबळे व नामदेव कांबळे यांना संधी मिळाली. त्यानंतर दीपक पाटील संचालक म्हणून कार्यरत झाले. गत वेळच्या निवडणुकीत तालुक्याच्या मागणीनुसार दीपक पाटील यांच्यासह राजेश पाटील यांनाही संधी दिली गेली. यावेळच्या निवडणुकीत आघाडींची रचना पाहता तालुक्याची दोन संचालक पदे टिकून राहणार का हा खरा प्रश्न आहे. 

तसे झाल्यास दोन्ही आघाडीतून आणखी एकेक उमेदवार द्यावा लागणार आहे. त्या जागी कोणाची निवड होणार याची उत्सुकता लागली आहे.  भाजपमधून BJP नुकतेच काँग्रेसमध्ये Congress दाखल झालेले गोपाळराव पाटील यांनी मुलगा विशाल यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ कै. सुरेशराव चव्हाण पाटील यांचे पुत्र विक्रमसिंह यांचाही उमेदवारी अर्ज आहे. आमदार पाटील यांच्या पत्नी सुश्मीता, दीपक पाटील यांच्या पत्नी ज्योती यांचेही उमेदवारी अर्ज आहेत. त्याशिवाय भरमाना गावडे, शामराव बेनके, अशोक जाधव,  एम. जे. पाटील यांचेही उमेदवारी अर्ज आहेत. Kolhapur Gokul Dairy Elections Politics Analysis 

गोकुळचे संचालक पद हे प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभ मिळवून देणारे आहे. त्यामुळे या पदावर निवडला जाणारा उमेदवार हा गटाशी एकनिष्ठ आणि भविष्यात अंगावर येणारा नसावा याची खबरदारी घेऊन निवड केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संबंधित गटाच्या उमेदवाराकडून आपल्या नावाची शिफारस करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत. यातून कोणाला लॉटरी लागणार हा उत्सुकतेचा विषय आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com