नेतेमंडळींच्या ग्रामपंचायतींचा निकाल लागणार शेवटच्या फेऱ्यांमध्ये 

नेतेमंडळींच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी ही शेवटच्या फेऱ्यांमध्ये ठेवण्यात आली आहे.
The Gram Panchayats of the leaders will be decided in the last round
The Gram Panchayats of the leaders will be decided in the last round

शिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील 62 ग्रामपंचायतींची मतमोजणी उद्या (ता. 18 जानेवारी) शहरातील "कुकडी हॉल' मधे होणार आहे. मतमोजणीसाठी वीस टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, चौदा फेऱ्यांमध्ये गावनिहाय मतमोजणी होणार आहे. 

दरम्यान, नेतेमंडळींच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी ही शेवटच्या फेऱ्यांमध्ये ठेवण्यात आली आहे. यात आमदार ऍड. अशोक पवार यांचे वडगाव रासाई, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचे शिक्रापूर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्‍वास कोहकडे यांचे कारेगाव व इतर संवेदनशील ग्रामपंचायतींचा निकाल हा शेवटच्या फेऱ्यांत ठेवण्यात आला आहे. 

शिरूर शहरातील कुकडी हॉलमध्ये एका वेळी वीस टेबलवरून ही मतमोजणी होणार आहे. मतदान यंत्र मतमोजणी कक्षातील टेबलवर आणणे, त्यांची नोंद करून सिल तोडणे आदी कामे झाल्यानंतर सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होणार असल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले. 

पहिल्या फेरीत केंदूर, कोरेगाव भीमा, मिडगुलवाडी तर दुसऱ्या फेरीत गोलेगाव, वढू बुद्रूक, सणसवाडी व करंदी आणि तिसऱ्या फेरीत उरळगाव, शिंदोडी, मलठण, विठ्ठलवाडी मतमोजणी होणार आहे. चौथ्या फेरीत सविंदणे, चिंचोली मोराची, कवठे येमाई, वरूडे, निमगाव भोगी; पाचव्या फेरीत कान्हूर मेसाई, पाबळ, धामारी.

सहाव्या फेरीत निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, वडनेर खुर्द, फाकटे, नागरगाव, पिंपळसुटी; सातव्या फेरीत गणेगाव दुमाला, बाभुळसर खुर्द, इनामगाव, शिरसगाव काटा, गुनाट; आठव्या फेरीत न्हावरे, कोळगाव डोळस, निर्वी, आलेगाव पागा व चिंचणी; नवव्या फेरीत निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, कोंढापुरी; दहाव्या फेरीत पारोडी, टाकळी भीमा, खंडाळे, वाघाळे, भांबर्डे, पिंपरी दुमाला, खैरेवाडी.

अकराव्या फेरीत आंधळगाव, कुरूळी, वडगाव रासाई, पिंपळे जगताप, दरेकरवाडी; बाराव्या फेरीत गणेगाव खालसा, बुरूंजवाडी, बाभुळसर खुर्द, निमोणे, कारेगाव, पिंपळे खालसा; तेराव्या फेरीत तळेगाव ढमढेरे, मुखई आणि चौदाव्या फेरीत शिक्रापूर ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे. 

एका फेरीची मतमोजणी झाल्यानंतर ते निकाल जाहीर केले जातील. लगेचच दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू केली जाणार आहे. त्यादृष्टीने मतमोजणी प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल, लॅपटॉप व इतर विद्युत उपकरणे आणण्यास प्रतिबंध असून नियमांचा भंग करणारांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार शेख यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com