राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना कोरोनाची लागण 

काळजी करण्यासारखं काही नाही.
Former NCP MLA Rajan Patil infected with corona
Former NCP MLA Rajan Patil infected with corona

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करून दिली आहे.

माजी आमदार पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी. मी सोलापूर येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या होम क्वारंटाइन होऊन काळजी घेत आहे. माझी तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा  ः पुणे जिल्ह्यात आजपासून सात दिवस रात्रीची संचारबंदी

पुणे : पुणे जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढते आहे. कोरोनाचा हा वाढता आलेख रोखण्यासाठी आजपासून (ता. ३) पासून सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा दरम्यान पुढील सात दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा जमावबंदी लागू राहणार आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जवळपास सर्वच बैठकीत लोकप्रतिनिधींनी लाॅकडाऊन नको पण कडक निर्बंध लागू करा अशी भूमिका घेतली. सुमारे चार तास ही बैठक सुरु होती. बैठकीनंतर हाॅटेल, बार, माॅल, चित्रपटगृहे पुढील दोन आठवडे पूर्ण बंद राहणार आहेत.  येत्या ३० एप्रिलपर्यंत राज्यातील शाळा काॅलेजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विना कारण गर्दी करणाऱ्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com