माजी आमदार जयवंतराव जगताप या कारणासाठी शरद पवारांना भेटणार

करमाळा तालुक्याने अन्याय व त्यागाची भूमिका कुठपर्यंत घ्यायची?
Former MLA Jayawantrao Jagtap will meet Sharad Pawar on Ujani water issue
Former MLA Jayawantrao Jagtap will meet Sharad Pawar on Ujani water issue

करमाळा (जि. सोलापूर) : उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी वाटपाचे नियोजन यापूर्वीच झालेले आहे. सध्या सांडपाण्याचा एक थेंबही उजनी धरणात येत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नवीन खडकवासला कालव्यात सांडपाण्याच्या नावाखाली उजनी धरणातून पाणी नेणे योग्य नाही. या प्रकल्पास दिलेली मान्यता तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील नेतेमंडळींना घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटून साकडे घालणार आहे, अशी माहिती माजी आमदार जयवंतराव जगताप (Jayawantrao Jagtap) यांनी दिली. (Former MLA Jayawantrao Jagtap will meet Sharad Pawar on Ujani water issue)

याबाबत अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगितले की, सोलापूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून महाराष्ट्रात परिचित होता. या भागाची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पक दृष्टीतून उजनी धरण उभारणीची संकल्पना पुढे आली. या धरणाची साईट दौंड तालुक्यातील पारगावजवळ निश्चित झाली होती. परंतु धरणाचा फायदा सोलापूर जिल्ह्याला व्हावा, यासाठी त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे नेते (स्व.) नामदेवराव जगताप यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावून धरणाची साईट बदलून माढा तालुक्‍यातील भीमानगर येथे घेतली. मराठवाड्यालादेखील उजनीचे पाणी मंजूर केले आहे. 

सध्या उजनी जलाशयातील पाण्याचे वाटप पूर्णपणे झाले आहे. तरीदेखील सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. उजनी धरणाची साठवण क्षमता 117 टीएमसी असली तरी साठलेल्या गाळमुळे साठवण क्षमता कमी झालेली आहे. त्याच बरोबर धरणाचा जवळपास 80 किलोमीटर असणाऱ्या व्यासामुळे बाष्पीभवनाद्वारेही पाणी कमी होते. त्याचाही सरकारने अशा योजनांना मंजुरी देण्यापूर्वी जलतज्ज्ञांकडून आढावा घेणे अपेक्षित आहे, असेही जगताप म्हणाले.

करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न देखील अजून प्रलंबित आहेत. तो पर्यंतच हा दुसरा मोठा अन्याय धरणग्रस्तांवर होणार आहे. तालुक्याच्या दृष्टीने तर हा निर्णय अतिशय अन्यायकारक होणार आहे. पाणी फक्त करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीस दिसण्यासाठीच आहे का. ‘धरण उशाला व कोरड घशाला’ अशी आमची अवस्था झाली आहे, अशा शब्दांत धरणग्रस्तांच्या समस्या जयवंतराव जगतापांनी मांडल्या.

करमाळा तालुक्याने अन्याय व त्यागाची भूमिका कुठपर्यंत घ्यायची? लाभ तर अजिबातच नाही. आता तरी सहनशिलतेचा अंत पाहू नये व इंदापूरला पाणी देण्यासाठी दिलेला तत्वतः मान्यतेचा आदेश रद्द केल्याची घोषणा तातडीने करावी. अन्यथा राजकीय भेद न बाळगता जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी पक्षभेद व गट -तट विसरून शेतकरी हितासाठी फार मोठे जनआंदोलन उभारतील. तत्पूर्वी जिल्ह्यातील नेते मंडळीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com