शिवसेनेला धोबीपछाड देत लोणी ग्रामपंचायतीवर माधवराव काळभोर गटाचा झेंडा 

हवेली तालुक्‍यातच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्यात गावकी-भावकीसाठी लोणी काळभोर ग्रामपंचायतप्रसिद्धआहे.
Flag of Madhavrao Kalbhor group on Loni Kalbhor Gram Panchayat
Flag of Madhavrao Kalbhor group on Loni Kalbhor Gram Panchayat

उरुळी काचन (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने झेंडा फडकावला. सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनेलने तब्बल तेरा जागा पटकावल्या असून, शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर व माजी सरपंच शरद काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. 

हवेली तालुक्‍यातच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्यात गावकी-भावकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीत ज्येष्ठ नेते माधवराव काळभोर, विलास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेल व शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर व माजी सरपंच शरद काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. प्रचारादरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याने लोणी काळभोरची निवडणूक संपुर्ण जिल्ह्यात चर्चेत आली होती. 

माधव काळभोर यांच्यासमवेत विलास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर हे मातब्बर नेते होते. प्रशांत काळभोर यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर, माजी सरपंच शऱद काळभोर, वंदना काळभोर आदींनी किल्ला लढवला होता. 

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय प्रभाग क्रमांक चारमधील योगेश प्रल्हाद काळभोर यांनी मिळविला. तर सर्वात कमी मताधिक्‍य प्रभाग क्रमांक सहामधील संगीता काळभोर यांना मिळाले. संगीता काळभोर यांनी माधुरी काळभोर यांचा अवघ्या एक मताने पराभाव केला. दुसरीकडे, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, बाळासाहेब काळभोर, दिग्जविजय काळभोर, कमलेश काळभोर आदी दिग्गजांना आपापल्या प्रभागात पराभव स्वीकारावा लागला. 


प्रभागनिहाय विजयी उमेदवार (कंसात पॅनेलचे नाव) ः प्रभाग 1- राजाराम बापू काळभोर, सविता गीताराम लांडगे व प्रियांका सचिन काळभोर (परिवर्तन पॅनेल). प्रभाग 2- ललिता राजाराम काळभोर (परिवर्तन पॅनेल), सुनील बाबूराव गायकवाड व सविता नितीन जगताप (अष्टविनायक पॅनेल). प्रभाग 3- माधुरी राजेंद्र काळभोर (परिवर्तन पॅनेल), राहुल दत्तात्रेय काळभोर (अष्टविनायक पॅनेल). प्रभाग 4- योगेश प्रल्हाद काळभोर, गणेश तात्याराम कांबळे व भारती राजाराम काळभोर (परिवर्तन पॅनेल). 
प्रभाग 5- भारत दत्तात्रेय काळभोर, ज्योती अमित काळभोर व रत्नाबाई राजाराम वाळके (परिवर्तन पॅनेल). प्रभाग 6- नागेश अंकुश काळभोर व संगीता सखाराम काळभोर (परिवर्तन पॅनेल), बकुळा पांडुरंग केसकर (अष्टविनायक पॅनेल). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com