Famous singer Anand Shinde's campaign Sabha for Bhagirath Bhalke in Mangalvedha
Famous singer Anand Shinde's campaign Sabha for Bhagirath Bhalke in Mangalvedha

आमदारकीसाठी नाव सुचविले म्हणून आलो नाही; तर गाववाले म्हणून भगिरथच्या प्रचारासाठी आलो

नानांच्या उपकाराची परतफेड करून भगिरथ भालके यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधान परिषदेसाठी माझं नाव सुचवले; म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी मतदारसंघात आलो नाही, तर मुंबईत भेटल्यावर (स्व.) आमदार भारत भालके हे मला ‘या गाववाले म्हणून हाक द्यायचे.’ तो शब्द आधाराचा आणि आपुलकीचा असल्यामुळे मी भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलो आहे, असे प्रसिद्ध गायक आणि मूळचे मंगळवेढ्याचे असलेले आनंद शिंदे यांनी सांगितले. 
     
महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारानिमित्त महमदाबाद, गुंजेगाव, मारापूर, मल्लेवाडी  ढवळस, देगाव आदी गावांत शिंदे यांनी प्रचार सभा घेतला. मारापूर येथील सभेत ते बोलत होते. या वेळी राहुल शहा, पी. बी. पाटील, नंदकुमार पवार, नगरसेवक अजित जगताप, तानाजी खरात, मारुती वाकडे, अशोक पाटील, मारुती मासाळ, चंद्रशेखर कोंडूभैरी, रामेश्वर मासाळ, अरुण किल्लेदार उपस्थित होते. 

प्रसिद्ध गायक शिंदे म्हणाले की शरद पवार हे सर्वसामान्यांची जाण असणारे नेते आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य गायकाची आमदार म्हणून विधान परिषदेवर शिफारस केली आहे. त्याच प्रमाणे माझ्या भूमीतील आमदार भारत भालके यांच्याशी अनेक वर्षांपासून माझे संबंध होते. मंत्रालयात कामानिमित्त सातत्याने येत असत. त्यांची कामाची चिकाटी व जिद्द वाखाणण्याजोगी होती. मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. सामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, हीच त्यांची भूमिका होती. खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. 

सर्वसामान्य माणूस मंत्रालयात जाऊन भारतनानांसोबत काम करू शकतो, हे मी उघड्या डोळ्यांनी मंत्रालयात पाहिले आहे. अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी व नानांच्या उपकाराची परतफेड करून भगिरथ भालके  यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहनही आनंद शिंदे यांनी केले.  

या वेळी भगीरथ भालके यांनी भाजपच्या ठेकेदार उमेदवारांकडून जनतेची कशी फसवणूक केली जाते, याचा पाढा वाचला. भारतनानांनी 35 गाव भोसे प्रादेशिक योजना, उजनी कालवा व माण नदीला पाणी सोडण्याबाबत घेतलेली ठाम भूमिका तसेच वीज, आरोग्य रस्ते यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे झालेली विकासकामे याची माहिती दिली. राज्यातील सरकार आपल्या विचारांचे असल्याने निधी कमी पडणार नसल्याचे सांगत निवडून देण्याचे आवाहन भालके यांनी केले. 

या वेळी दामाजी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भुजंगराव आसबे, शहाजी यादव, संजय आसबे,  रमेश आसबे ,योगेश आसबे, रवींद्र कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com