आवताडे गटाच्या सभापतीच्या गावात भालके गटाचा सरपंच  - Election of Sarpanch-Deputy Sarpanch post of 23 villages in Mangalwedha taluka | Politics Marathi News - Sarkarnama

आवताडे गटाच्या सभापतीच्या गावात भालके गटाचा सरपंच 

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

संवेदनशील नंदेश्‍वरमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले सरपंचपदाच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळा पडून गावच्या सत्तेची सुत्रे हातात घेतली. 

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्‍यातील 23 गावच्या सरपंच निवडी गुरुवारी (ता. 11 फेब्रुवारी) पार पडल्या. मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती आणि आवताडे गटाच्या प्रमुख असलेल्या प्रेरणा मासाळ यांच्या हुलंजती गावात मात्र भालके गटाने बाजी मारून सरपंचपद पटाकावले. संवेदनशील नंदेश्‍वरमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले सरपंचपदाच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळा पडून गावच्या सत्तेची सुत्रे हातात घेतली. 

तालुक्‍यातील 23 गावांतील सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली. नंदेश्वर येथे एकमेकांच्या विरोधात लढलेले गरंडे व ढोलतडे हे सरपंच व उपसरपंच पदाची वाटणी करून एकत्र आले. हुलजंती येथे भालके आणि आवताडे गट एकत्र येऊन लढला होता. त्यांना 8 जागा मिळून बहुमत मिळाले होते. मात्र, सरपंच निवडीच्या वेळी पहिली वर्षे कोणी घ्यायची यावरून वाद झाला. मात्र, मतदानात भालके गटाने बाजी मारत सरपंचपदी मीनाक्षी कुरमत्ते विराजमान झाल्या. त्यानंतर मात्र उपसरपंच बाळासाहेब माळी यांची निवड बिनविरोध झाली. 

मरवडे येथे नामदेव गायकवाड, लतिफ तांबोळी, दत्तात्रेय गणपाटील, संदीप सूर्यवंशी, श्रीकांत गणपाटील, यांनी स्थापन केलेल्या गाव विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. महमदाबाद शेटफळ येथे समविचारी तरुणांनी गावगाडा ताब्यात घेतला. भोसे येथे अवताडे गटाचे उपसभापती सुरेश ढोणे यांच्या पत्नीला सरपंचपद मिळाले, तर उपसरपंचपद भालके गटाला मिळाले. कचरेवाडी येथे अवताडे गटाला सत्ता मिळूनही सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. 

गणेशवाडी येथे राखीव जागेचा उमेदवार नसल्यामुळे ते पद रिक्त राहिले. उपसरपंच म्हणून दीपाली तानगावडे यांची निवड झाली. बोराळे येथे स्थानिक एकत्र येत केलेल्या आघाडीला सत्ता मिळाली, त्यामुळे सरपंच व उपसरपंचपद बिनविरोध झाले. डोणज येथे दोन्ही पॅनेलला समसमान जागा मिळाल्या. पण, बिनविरोध सदस्याने आवताडे गटाला कौल दिल्यामुळे आवताडे गटाला सरपंचपद मिळाले, तर बिनरोध सदस्य सिद्धाराम कोळी यांना उपसरपंचपद मिळाले. 

कर्जाळ कात्राळ येथे दामाजी संचालक विजय माने यांच्या पत्नी सरपंच पदी विराजमान झाल्या. बिनविरोध निवडणूक झालेल्या मुढवी येथे महावीर ठेंगील हे सरपंच, तर मंदाकिनी रोकडे बिनरोध निवडले. सिद्धापूर येथे परिचारक गटाने भालके गटांच्या मदतीने सत्ता मिळवली. मल्लेवाडी येथे आवताडे-भालके समर्थकांनी सत्ता मिळवली. 

काही गावचे सरपंच व उपसरपंच यांच्याशी संपर्क साधून गटाविषयी विचारणा केली असता मंगळवेढा तालुक्‍यातील सर्वच नेत्यांवर हक्क ठेवत आम्ही सगळ्यांचे असल्याचा दावा करून गाव विकास आघाडीचा दावा केला. मात्र, आगामी काळात होणाऱ्या सहकारी संस्था व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा दावा फोल ठरेल, याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे 

मंगळवेढा तालुक्‍यातील गावनिहाय सरपंच व उपसरपंच 

कर्जाळ/कात्राळ ः वैष्णवी माने, सुनंदा बंडगर, मुढवी ः महावीर ठेंगील, मंदाकिनी रोकडे, सिद्धापूर ः लक्ष्मीबाई नांगरे, भिमराया सिंदखेड, महमदाबाद शे: सरिता सुडके, संतोष सोनवणे, आसबेवाडी ः स्वाती आसबे, शोभा खताळ, अरळी ः मल्लिकार्जुन भांजे, लक्ष्मीबाई रजपूत, मल्लेवाडी ः दीपाली गोडसे अजित माळी, गणेशवाडी : दीपाली तानगावडे, हुलजंती ः मीनाक्षी करमुत्ते, बाळासाहेब माळी, नंदेश्वर ः सजाबाई गरंडे, आनंदा पाटील, मरवडे ः सचिन घुले, मीनाक्षी सूर्यवंशी, बालाजीनगर ः अंजना राठोड, अश्विनी राठोड, लवंगी ः अलका देवकर, सदाशिव लेंगरे, डोणज ः किर्ती केदार, सदाशिव कोळी, बोराळे : सुजाता पाटील, संतोष गणेशकर, लेंडवेचिंचाळे : नंदा इंगोले, द्वारकाबाई लोखंडे, सलगर बुद्रुक : शशिकला टिक्के, श्रीमंत सवाईसर्जे, माचणूर : पल्लवी डोके, उमेश डोके, तामदर्डी : रेखा शिंदे, बळिराम शिनगारे, घरनिकी : सुनीता रणदिवे, बापू भुसे, भोसे ः सुनीता ढोणे, श्‍यामल काकडे, कचरेवाडी : संगीता काळुंगे, संपदा इंगोले, तांडोर : कविता मळगे, रोशन शेख. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख