बबनदादा म्हणाले,"माने माझ्या मतदारसंघातील': त्यावर भरणेंचा चिमटा "...पण पाणी पंढरपूरचंच हाय'! 

पालकमंत्री साहेब, तुम्ही राज्याचे बांधकाम मंत्री आहात, जिल्ह्यातील एकही रस्ता माणसांना जाण्यायोग्य नाही.
Do not bring ZP issues in the District Planning Committee meeting : Dattatreya bharane
Do not bring ZP issues in the District Planning Committee meeting : Dattatreya bharane

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ज्या विषयांवर चर्चा झाली, तेच विषय आज (ता. 23 जानोवारी) पुन्हा एकदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आले. तुम्ही झेडपीचे विषय झेडपीतच सोडवा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे विषय आणू नका, अशी सूचना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली. 

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी हे प्रश्‍न झेडपीत सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचा सल्लाही भरणे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला. 

वारंवार बोलणाऱ्या सदस्यांना पुणेरी भाषेत चिमटा काढत पालकमंत्र्यांनी यांनी बैठकीतला आपला वकूब आज दाखवून दिला. पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक सात रस्ता येथील नियोजन भवनात झाली. जास्त बोलणाऱ्या सदस्यांना कोपरखळ्या आणि चिमटे घेऊन आवरत पालकमंत्री भरणे यांनी ही बैठक यशस्वी करून दाखविली. 

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे म्हणाले, पालकमंत्री साहेब, तुम्ही राज्याचे बांधकाम मंत्री आहात, जिल्ह्यातील एकही रस्ता माणसांना जाण्या योग्य नाही. बांधकाम विभागाचा काही निधी रस्त्यांसाठी देता येतोय का बघा.'' भरणे यांना या प्रश्‍नातील उपरोधकपणा पटकन लक्षात घेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. आमदार बबनदादांची रस्त्याची काही कामे प्रलंबित आहेत, हे बघण्याचा सूचना केली. काढलेल्या चिमट्यातून स्वत:ला सावरत पालकमंत्री भरणे म्हणाले, ""जिल्ह्यातील रस्त्याची किती कामे प्रलंबित आहेत हे बघा.'' 

बैठकीत सातत्याने प्रश्न विचारणारे माळशिरसचे जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांना आता सगळे संपलेय, तुमचे प्रश्न थांबवा, असे म्हणून पालकमंत्री भरणे यांनी तोडकर यांना आवरते घेण्यास भाग पाडले. 

माळशिरसच्या प्रश्नावर बोलणाऱ्या आमदार राम सातपुते आणि अरुण तोडकर यांना पाहून पालकमंत्री भरणे म्हणाले, "माळशिरसवाले लय जोरात बोलतात.' 

तेवढ्यात पालकमंत्री भरणे यांचे लक्ष पंढरपूर तालुक्‍यातील झेडपी सदस्य सुभाष माने यांच्याकडेही गेले. पंढरपूरवाले पण जोरातच बोलतात, असे सांगितले. आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, ""माने हे माझ्या मतदारसंघातील आहेत.'' परंतु पाणी पंढरपूरचे असल्याचे सांगत पालकमंत्री भरणे यांनी चिमटा काढला. 

एका वाक्‍यातही भावना पोचल्या असत्या 

प्रत्येक सभेत आनंद चंदनशिवे स्वत:च बोलतात. महिलांना बोलू देत नाहीत. निबंधासारखे एकाच विषयावर जास्त वेळ बोलत असल्याची तक्रार माळशिरसच्या सदस्या ज्योती पाटील यांनी केली. भाषणातून आपला मुद्दा सभेत मांडणाऱ्या आमदार राम सातपुतेंना पालकमंत्री भरणे यांनीही चिमटा काढला. भाषण न देता एका वाक्‍यात सांगितले असते, तरीही माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोचल्या असत्या अशी मिश्‍किल टिपण्णी पालकमंत्री भरणे यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com