ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या त्या घोषणेचा ठाकरे सरकारला बसणार 'करंट' ?

राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा, अर्थमंत्री राष्ट्रवादीचा आणि ऊर्जा खाते कॉंग्रेसकडे अशा विचित्र स्थितीत विज बिलाच्या बाबतीत ठोस निर्णय होताना दिसत नाही.
Dissatisfaction among the people of the state over the disconnection of power connections
Dissatisfaction among the people of the state over the disconnection of power connections

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी पक्ष असल्याचा आरोप कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सातत्याने केला आहे. त्याचा काहीसा परिणामही शेतकऱ्यांच्या मनावर झाल्याचे यापूर्वी दिसले आहे. राज्यातील वीजबिलाचा प्रश्‍न सध्या गाव पातळीवर पेटला आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या सरकारकडून थकित विजबिलासाठी थेट कनेक्‍शन तोडले जात असल्याने सरकारबद्दल जनमानसांत आक्रोश तयार होऊ लागला आहे.

गेल्या दीड वर्षातील वीजबिलाचा मुद्दा हा सरकारबद्दलच्या नाराजीचा सर्वात प्रभावी मुद्दा ठरू लागल्याने कट केलेल्या वीज कनेक्‍शनचा करंट आगामी काळात महाविकास आघाडीच्या सरकारला बसण्याची दाट शक्‍यता आहे. 

व्यावसायिक, घरगुती आणि शेतीसाठी लॉकडाऊनच्या काळात विज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले आली. लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल माफ होईल किंवा त्यात काही तरी सवलत मिळेल, अशी अपेक्षा वीज ग्राहकांना लागली होती. ना सवलत ना माफी वीजबिलाच्या वसुलीसाठी थेट कनेक्‍शन कपात करण्याची मोहिमच महावितरणने हाती घेतली आहे. त्यामुळे जनमानसांत सरकारबद्दल चिड निर्माण होऊ लागली आहे. अवकाळी, गारपीट, महापूर, लॉकडाऊनमुळे घसरलेले शेतमालाचे भाव या सर्व अडचणींना तोंड दिलेला बळीराजा सध्या स्थिरावत असतानाच आता वीज तोडणीचे संकट त्याच्या डोक्‍यावर घोंगावत आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस कार्यकर्त्यांची विचित्र अवस्था 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी ज्या राजकीय पक्षांनी आवाज उठवायला हवा होता ते कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना सध्या सत्तेत आहे. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा, अर्थमंत्री राष्ट्रवादीचा आणि ऊर्जा खाते कॉंग्रेसकडे अशा विचित्र स्थितीत विज बिलाच्या बाबतीत ठोस निर्णय होताना दिसत नाही. वीज कनेक्‍शन तोडणीच्या मुद्यांवरुन तीनही पक्षाच्या नेत्याचा थेट संबंध असल्याने शेतकऱ्यांचे दुखणे दिसत असूनदेखील सरकार आपले असल्याने काहीच बोलू शकत नाही, अशी विचित्र अवस्था या तीनही पक्षातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची झाली आहे. 

भाजप लागला कामाला 

शेतकऱ्यांच्या याच प्रश्‍नासाठी भाजप मात्र विधीमंडळ ते गाव पातळीपर्यंत आक्रमक झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात कनेक्‍शन तोडणीचा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ कनेक्‍शन तोडणीस स्थगिती दिली. पण, अधिवेशन संपले त्याच दिवशी विधान परिषदेत बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ती स्थगिती उठवण्याची घोषणा केली. अधिवेशनापुरते टळलेले वीज कनेक्‍शन तोडणीचे संकट आता पुन्हा एकदा सुरू झाले आहे. वीज कनेक्‍शन तोडणीच्या माध्यमातून जनमानसातील रोष संघटित करण्यासाठी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. 

शेट्टींच्या 'स्वाभिमानी'चा आवाज झाला बोथट 

माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत आहे की विरोधात? याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची धार सत्तेमुळे बोथट झाल्याचे उघड वास्तव आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे; परंतु दुभंगलेली संघटना, संघटनेत आलेली मरगळ यामुळे स्वाभिमानीचा आवाज किती प्रभावी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतर शेतकरी संघटना या मुद्यावर आक्रमक होत आहेत; परंतु त्यांचा आवाज मुंबईपर्यंत पोचण्याची शक्‍यता कमीच आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com