समाधान आवताडे आणि आमच्यातील वाद मिटेल; पण नेतृत्व कोणाचे स्वीकारायचे?

तरुणांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज भरला आहे.
The dispute between us will end; But who should accept the leadership: Siddheshwar Avtade
The dispute between us will end; But who should accept the leadership: Siddheshwar Avtade

मंगळवेढा : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे काहींना वाटते की आमच्यात (समाधान आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे) वाद आहेत. आमच्यातील वाद मिटेल; पण नेतृत्व कोणाचे स्वीकारायचे, हे जनतेच्या हातात आहे, असे मंगळवेढा खरेदी विक्री सहकारी संघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी व्यक्त केले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांनीही अर्ज दाखल केल्यामुळे ते राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील  आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची भेट घेवून सिद्धेश्वर आवताडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, मोहिते पाटील यांची ती शिष्टाई अयशस्वी ठरली आहे. सिद्धेश्वर आवताडे यांनी माघार न घेता आपला प्रचार दौरा जोमाने सुरू ठेवला आहे. 

याबाबत सिद्धेश्वर आवताडे म्हणाले की, मतदारसंघातील तरुणांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज भरला आहे. मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणामध्ये विविध सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही भरीव विकास कामे केली आहेत. मी कुणाच्या विरोधात म्हणून अर्ज भरलेला नाही तर लोकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे म्हणून अर्ज भरला आहे.

तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी, मतदारसंघातील विकासकामासाठी, तसेच माता भगिनींच्या संरक्षणासाठी मी प्रयत्न करणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्यावर आतापर्यंत निवडणून आले. पण, प्रत्यक्षात पाणी मात्र आले नाही. निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या निमित्ताने पाणी आणतो; म्हणून अनेक नेते येतील. पण ते या मतदारसंघातील मतदारही नाहीत.

सोलापूर, पुणे ही शहरे ज्या प्रमाणे स्मार्ट झाली, त्या पद्धतीने तरुणांनी व तालुक्यातील मतदारांनी मला संधी दिली, तर मंगळवेढा आणि पंढरपूर ही शहरे स्मार्ट करण्यासाठी माझा प्रयत्न राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com