फडणवीसांच्या करेक्ट कार्यक्रमाची धनंजय मुंडेंनी उडवली खिल्ली - Dhananjay Munde criticizes Devendra Fadnavis from Correct program | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

फडणवीसांच्या करेक्ट कार्यक्रमाची धनंजय मुंडेंनी उडवली खिल्ली

हुकूम मुलाणी
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कुणाचाही नाद करा पण पवारांचा नाद करू नका, याची आठवण सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी करून दिली.

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, उर्वरीत करेक्ट कार्यक्रम मी करतो, त्या विधानाची खिल्ली उडवत कुणाचाही नाद करा पण पवारांचा नाद करू नका, याची आठवण सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी करून दिली.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ब्रम्हपुरीत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, उमेदवार भगीरथ भालके, राजू आवळे, प्रवक्ते उमेश पाटील, दीपक साळुंके, संकल्प डोळस, तानाजी खरात, विजयकुमार खवतोडे, शिवाजी काळुंगे, शलाखा पाटील, लतीफ तांबोळी, नितीन नकाते, रमेश भांजे, गणेश पाटील, पी. बी. पाटील, भारत बेदरे, मुझ्झमील काझी, नंदकुमार पवार, समाधान फाटे, ईश्वर गडदे, संदीप बुरकूल, संदीप फडतरे, सुनील डोके, अर्जुनराव पाटील उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीत मृत लोकप्रतिनिधीच्या पश्चात निवडणुका बिनविरोध होत होत्या. पण, येथे मात्र वेगळे झाले आहे. विधानसभेच्या 2019 च्या  निवडणुकीत कासेगाव येथील प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘तुम्ही कुणाचाही नाद करा; पण पवारसाहेबांचा नाद करू नका,’ असे सांगितले होते. त्या निवडणुकीच्या निकालानंतर खऱ्या लोकशाहीचे दर्शन पवारसाहेबांनी दाखवून दिले. तरीही पुन्हा येईन, असा नाद पुन्हा पुन्हा करू नका, असे म्हणतोय.

कोविडबद्दलही सध्या राजकारण होते आहे. गेल्या ७० वर्षात लसीचे राजकारण काँग्रेसने केले असते, तर भाजपचे अनेक जण लंगडत लंगडत आले असते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे म्हणून लसीचे राजकारण करत असाल, तर त्याचा राग व्यक्त करण्याची संधी पोटनिवडणुकीतून आली आहे. या निवडणुकीत डिझेल, पेट्रोल, गॅस का वाढला, याचा जाब विचारण्याची वेळ आहे. 

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या केंद्रातून निधी आणण्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुंडे म्हणाले की, या भागातील जनतेने भाजपचा खासदार निवडून देऊनही केंद्रातील सरकारकडून मंगळवेढ्यातील योजनेसाठी पैसे का दिले नाहीत. निवडणुकीत खालच्या पातळीवर राजकारण का केले हे समजत नाही. नानांच्या दुर्दैवी जाण्याने लागलेली निवडणूक आहे, नानांनी दिलेला तोच वारसा भगिरथकडून पुढे जपला जाईल.’’

प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, ही पोटनिवडणूक लागणार होणार नव्हती. पण भाजपाने निवडणूक लावली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज न उठवलेल्यांना पैशाच्या जोरावर संधी दिली. 

उमेदवार भगिरथ भालके म्हणाले की, स्व भारतनानांनी 11 वर्षांच्या काळात जात पात न बघता मदत केली. तीच जबाबदारी यापुढील काळात पार पाडली जाईल. भाजपकडून दिशाभूल करून माझ्याबद्दल अपप्रचार करून मते मागीतली जात आहेत. मी 2019 मध्ये माईकवर न बोलताही बोलल्याचा आरोप केला जात आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख