मराठा क्रांती मोर्चाचा आठ डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा 

कोणत्याच प्रश्‍नाची पूर्तता राज्य सरकारकडून झालेली नाही.
Dhadak Morcha of Maratha Kranti Morcha on 8th December at Vidhan Bhavan
Dhadak Morcha of Maratha Kranti Morcha on 8th December at Vidhan Bhavan

पुणे : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या आठ डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय मोर्चाच्या समन्वय समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत आज पुण्यात घेण्यात आला.

महावितरण कंपनीची नोकरी भरती रखडली आहे. त्यासाठी एक व दोन डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्याच्या महावितरण अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. 2016 ते 2020 या काळातील रखडलेली नोकरभरती करण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. यातील कोणत्याच प्रश्‍नाची पूर्तता राज्य सरकारकडून झालेली नाही. त्यामुळे मोर्चा काढावा लागत असल्याचे क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. सात डिसेंबरच्या दरम्यान तीन किंवा चार दिवसांचे अधिवेशन होण्याची शक्‍यता आहे. या बाबत राज्य सरकार दोन डिसेंबरला निर्णय घेणार आहे. अधिवेशनाची तारीख बदलली, तर त्यानंतर लगेचच "लॉंग मार्च' या ताकदीने काढण्यात येईल, असे कोंढरे यांनी सांगितले. 

अकरावी प्रवेशापासून इतर सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या साऱ्या समस्यातून राज्य सरकारने लवकरात लवकर मार्ग काढण्याची भरज आहे. वास्तविक, गेल्या तीन महिन्यांत यातून बऱ्याच विषयातून राज्य सरकारला मार्ग काढता येणे शक्‍य होते. मात्र, राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

या बैठकीला क्रांती मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 2016 ते 2020 या काळात राज्य सरकारने विविध पदांवर उमेदवारांची निवड केली. मात्र, नियुक्‍त्या करण्यात आल्या नाहीत. या नियुक्‍त्या तातडीने करण्यात याव्यात, अशी यातील मुख्य भूमिका आहे. 

सरकारला तीन महिन्यांचा वेळ होता. मात्र, या काळात मराठा समाजासाठी सरकारने काहीही केलेले नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना यातून निर्माण झाली असून यावर बैठकीत चर्चा झाली. आठ डिसेंबरच्या मोर्चासाठी जिल्हानिहाय तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मुंबईत वाहनाने पोचण्याचे नियोजन असून तिथे पोचल्यानंतर विधान भवनावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. अधिवेशन झालेच नाही तर त्यानंतर संपूर्ण तयारीनिशी "लॉंग मार्च' काढण्यात येणार असून त्याची तयारीदेखील करण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com