मंगळवेढ्यात ग्रामपंचायत उमेदवारावर प्राणघातक हल्ला 

त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
Deadly attack on Gram Panchayat candidate in Mangalwedha taluka
Deadly attack on Gram Panchayat candidate in Mangalwedha taluka

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतीच्या 186 जागांसाठी चुरशीने 79.59 टक्के इतके मतदान झाले. मतदानादरम्यान नंदेश्‍वर व सिध्दापूरमध्ये वादावादी झाली.

नंदेश्वर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार ज्ञानदेव सुखदेव गरंडे, त्यांचा भाऊ रामदास सुखदेव गरंडे यांच्यावर विरोधी गटाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात उमेदवार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविले असून यातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली. 

दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

विधानसभेची होणारी पोटनिवडणूक व दामाजी कारखान्याचे निवडणूक पाहता सर्वच नेत्यांनी समर्थकांना आपल्या गावात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध मार्गाने मदतीचा हात दिला असल्यामुळे ग्रामीण भागातील गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचे वर्चस्व कसे राहिल. यासाठी नेटाने प्रयत्न केले. दोन दिवसापूर्वी सर्वच नेत्यांनी मतदान शांततेत पार पाडावे, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसह मतदारांना केले. 

गेल्या दोन दिवसांपूर्वी मतदारांचा कौल आजमावण्याचा दृष्टीने विविध प्रकारचे आमिष दाखवले. त्यामध्ये मतदाराचे चोचले पुरवण्यात आले. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी तिर्थक्षेत्र विकासाचा निधी यामुळे अनेकांनी यात लक्ष घालत निवडणूक प्रतिष्ठेची केली, तर यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण (सलगर बु), सभापती प्रेरणा मासाळ (हुलजंती), उपसभापती सुरेश ढोणे (भोसे), नितीन नकाते (बोराळे), रमेश भांजे (अरळी) या प्रमुख नेत्यांची गावे असल्यामुळे निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली. 

सिध्दापूर येथे दोन गटात वादावादी झाली. एकाचे कपडे फाडण्यात आले, तर दुसऱ्या गटाकडून उलट मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत तणावाची परिस्थिती आटोक्‍यात आणली. नंदेश्‍वरमध्ये अंतिम टप्प्यात वादीवादीतून हाणामारी झाली. पोलिसांनी लेंडवेचिंचाळे, नंदेश्‍वर, भोसे, हुलजंती, सिध्दापूर, मरवडे, माचणूर ही गावे संवेदनशील घोषित केले होते. 

गावनिहाय मतदान एकूण मतदान, कंसात झालेले मतदान : मरवडे 4 हजार 706 (3817), लमाण तांडा 1 हजार 329 (1039), तांडोर 932 (825), सिद्धापूर 2 हजार 938 (2525), कात्राळ 1 हजार 169 (867), आसबेवाडी 928 (856), बोराळे 4 हजार 143 (3397), गणेशवाडी 1 हजार 295 (979), डोणज 3 हजार 88 (2 हजार 573), हुलजंती 3 हजार 704 (2 हजार 954), महमदाबाद शे. 702 (658), मल्लेवाडी 846 (726), नंदेश्‍वर 5 हजार 283 (4 हजार 344), लेंडवेचिंचाळे 2 हजार 85 (1 हजार 747), लवंगी 2 हजार 386 (1 हजार 791), अरळी 2 हजार 80 (1 हजार 761), सलगर बुद्रुक 3 हजार 468 (2 हजार 687), माचणूर 1 हजार 795 (1 हजार 506), तामदर्डी 221 (170), कचरेवाडी 2 हजार 398 (1 हजार 873), घरनिकी (3 हजार 69), भोसे 4 हजार 746 (2 हजार 866). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com