माजी आमदार नारायण पाटलांचे 23 वर्षे रखडलेल्या दहिगाव योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

दहिगाव उपसा सिंचन योजनेला 10 नोंव्हेबर 1996 मध्ये मंजुरी मिळाली. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते.
Dahigaon Upsa Irrigation Scheme should be done on solar energy : Narayan Patil :
Dahigaon Upsa Irrigation Scheme should be done on solar energy : Narayan Patil :

करमाळा (जि. सोलापूर) : गेली 23 वर्षांपासून रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजना आपण प्रयत्न करून सुरू केली आहे. दहिगाव उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर चालवण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊले उचलावीत, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या निवेदनाच्या प्रति राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती देताना नारायण पाटील यांनी सांगितले की, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच टेंभू-म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर चालवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचन संबंधित अधिकाऱ्यांना केली. याच धर्तीवर आता दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाबाबत सूचना देण्यात याव्यात. आपण आपल्या आमदारकीच्या कालावधीत तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना 28 मे 2018 रोजी निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून याकामाबाबत मागणी केली होती. यावर त्यांनी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचे महासंचालक यांना सूचना देऊन अहवाल तयार करण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या.

याच कामाबाबत आपण तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही 22 मे 2018 मध्ये मागणी केली. तसेच, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. 

दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 750 अश्वशक्तीचे जवळपास नऊ ऊर्जापंप कार्यरत असून यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

भविष्यकाळचा विचार करुन दहिगाव येथील पंपहाऊस जवळ सौरऊर्जा प्रकल्प तयार करुन ही संपूर्ण योजना त्यावर कार्यान्वित केल्यास विजेची बचत होऊन शेतकरी व सरकार यांच्या वीजबिलासंदर्भात आर्थिक बचत होईल. तसेच, विजेअभावी ही योजना खंडीत होणार नाही.

आता जलसंपदा विभागाने टेंभू म्हैसाळ सिंचन प्रकल्पाबरोबरच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतही प्राधान्याने विचार करुन ही योजना सौरऊर्जेवर चालवण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी आपण निवेदनाद्वारे केली आहे, असे नारायण पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, तसेच दहिगाव उपसा सिंचन योजना ही सौरउर्जेवर चालविण्यात यावी, यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे दहिगाव उपसा सिंचन योजना...

दहिगाव उपसा सिंचन योजनेला 10 नोंव्हेबर 1996 मध्ये मंजुरी मिळाली. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. तर माजी राज्यमंत्री  (स्व) दिंगबरराव बागल हे आमदार होते. गेली वीस वर्षे ही योजना रखडली आहे. ही योजना शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या काळात कार्यान्वित झाली. गेल्या वीस वर्षात प्रत्येक निवडणुकीत दहिगाव उपसा सिंचन योजना प्रचाराचा मुद्दा म्हणून गाजली. आमदार संजय शिंदे हेही आमदार झाल्यापासून या योजनेकडे लक्ष देत आहेत.


►या योजनेतून करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील 24 गावांतील 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

►या योजनेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्याची गेल्या वर्षी चाचणी घेण्यात आली आहे. 

►पहिला टप्पाची लांबी  ः 10 किलोमीटर (त्यात 3 किलोमीटर पाइपलाइन)


►दुसरा टप्पा : मुख्य कालवा लांबी 36 किलोमीटर व इतर लघु वितरीका  (6 किलोमीटर पाइपलाइन )

►जेऊरवाडी, कुंभेज, खडकेवाडी, गुळसडी, देवळाली, पांडे, अर्जुननगर, हिसरे, शेलगाव (क), फिसरे, सरपडोह, सौंदे, सालसे, आळसुंदे, साडे, वरकटणे, कोंढेज, जेऊर, शेलगाव (वां), लव्हे, घोटी, निंभोरे, वरकुटे या गावांसह अन्य गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com