त्या नगरसेवकाला सभापती करण्यासाठी कॉंग्रेस भाजपसोबत : महेश कोठेंचा आरोप 

सत्तेची समीकरणे बदलूनही कॉंग्रेसने शिवसेनेविरुद्ध केलेल्या कारस्थानाचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाईल.
Congress is going with BJP to make that corporator the sabhapati
Congress is going with BJP to make that corporator the sabhapati

सोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर असले तरी सोलापुरात मात्र या तीनही पक्षांचे सूर जमतील, असे चित्र नाही. कारण, या अगोदर पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर नाराज असलेली शिवसेना आता कॉंग्रेसाविरोधात बोलत आहे. हे तीन पक्ष एकत्र आले तर भाजपची कोंडी करू शकतात, पण महापालिकेत पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सोयीचे राजकारण केले जात असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, "भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला विषय समितीचा सभापती करण्यासाठी कॉंग्रेसचे काही नेते त्या पक्षासोबत जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे. सत्तेची समीकरणे बदलूनही कॉंग्रेसने शिवसेनेविरुद्ध केलेल्या कारस्थानाचा अहवाल पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाईल,' असेही कोठे यांनी सांगितले. 

राज्यात सत्तेत असलेले कॉंग्रेस-शिवसेना हे दोन पक्ष सोलापूर महापालिकेत मात्र आमने-सामने पहायला मिळत आहे. त्यावर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणतात, "मी महापालिकेचा सदस्य नसून त्याबद्दल गटनेत्यांकडून माहिती घ्यावी लागेल. आमचे सर्व निर्णय ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे या घेतात.' 

शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणतात की, महापालिकेत कॉंग्रेस मदत करत नाही. दरम्यान, संपर्कमंत्री शंकरराव गडाख यांचा सोलापूर दौरा अद्याप निश्‍चित नसल्याने कोठेंनी पाठविलेल्या अहवालावर पक्षप्रमुख काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे. 

कॉंग्रेस शहराध्यक्षांचा इशाऱ्याचा फुसका बार 

राज्यातील महापालिकांत स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली. दुसरीकडे कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या सोलापूरकरांना स्वच्छता व आरोग्य उपविधी कराचा बोजा नको; अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष वाले यांनी निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, निवेदन देऊन एक महिना होऊनही कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना त्या इशाराची आठवण झालेली नाही. 

शिवसेनेला मदतीचा विसर : कॉंग्रेस 

मागच्यावेळी परिवहन सभापती शिवसेनेचा झाला. त्यावेळी कॉंग्रेसने शिवसेनेला मदत केली होती आणि पुढच्यावेळी परिवहन सभापती कॉंग्रेसचा होण्यासाठी शिवसेना मदत करेल, असे ठरले होते. त्यासाठी मी दोनदा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या दालनात भेटायला गेलो होते. तरीही त्यांनी आता परिवहन समितीचा सभापती निवडताना कॉंग्रेससोबत काहीच चर्चा केली नाही. दिलेला शब्द शिवसेनेने पाळला नाही. तरीही आता "जे झाले ते गंगेला मिळाले' असे समजून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी काम करतील, असा विश्‍वास कॉंग्रेस शहराध्यक्षांनी व्यक्त केला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com