मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अकोल्यावर फोकस 

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोल्यातील संख्या पाचशेच्यावर गेली आहे. मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक वेगाने अकोल्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा फोकस अकोल्यावर वाढवला आहे. एकाच आठवड्यात त्यांनी दुसऱ्यांदा शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून येथील परिस्थितीची माहिती घेऊन उपाय योजनांबाबत आदेश दिले.
Chief Minister interacts with Shiv Sena office bearers in Akola
Chief Minister interacts with Shiv Sena office bearers in Akola

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोल्यातील संख्या पाचशेच्यावर गेली आहे. मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक वेगाने अकोल्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा फोकस अकोल्यावर वाढवला आहे. एकाच आठवड्यात त्यांनी दुसऱ्यांदा शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून येथील परिस्थितीची माहिती घेऊन उपाय योजनांबाबत आदेश दिले. 

कोरोना विषाणू संसर्गाबाबत अकोल्यातील स्थिती विस्फोटक झाली आहे. यंत्रणाच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. गत पाच दिवसांत 100 च्या वर रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अकोल्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शिवसेना जिल्हा सचिव प्रदीप गुरुखुद्दे, शहर प्रमुख अतुल पवनीकर आदी पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री तातडीने बैठक घेऊन उपाययोजनांसंदर्भात माहिती घेऊन व आवश्‍यक त्या सूचना केल्या. 

अडीच तास चर्चा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री दहा वाजता तातडीने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तब्बल अडीच तास म्हणजे मध्यरात्री साडेबारापर्यंत ही मॅरेथॉन बैठक सुरू होती. त्यात जिल्ह्यातील कोरोना विषाणूपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतच्या सर्व विषयांची सांगोपांग चर्चा केली. 
 

रुग्णसंख्या शून्य हवी ः जिल्हा प्रशासनाला निर्देश 

अकोला शहरासह जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अकोला जिल्ह्यावर फोकस केला आहे. त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची व्हीसी घेतली. त्यात त्यांनी जिल्हाधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची सूचना केली. उपाययोजना करताना पालकमंत्र्यांनाही या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याबाबत सूचित केले. 
 

मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टरांची मदत 

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची अकोल्यातील संख्या वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात आरोग्य विभागाला येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टरांसोबत गुरुवारी अकोला येथील आरोग्य विभागाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी व डॉक्‍टरांची चर्चा करण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com