भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षावर बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल 

शुक्रवारी दुपारी सुरु केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
BJP Yuva Morcha's Pandharpur city president Vidul Athtrao has been charged with illegal money lenders
BJP Yuva Morcha's Pandharpur city president Vidul Athtrao has been charged with illegal money lenders

पंढरपूर : पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडुरंग अधटराव याच्या विरोधात शनिवारी (ता. 6 मार्च) सकाळी शहर पोलिस ठाण्यात बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पंढरपूर शहरातील 
राजकीय वर्तुळात व बेकायदा सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

विदूल अधटराव याच्या पंढरपुरातील संतपेठ येथील घरावर पोलिस आणि निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 5 मार्च) छापा टाकून कारवाई केली होती. कारवाईदरम्यान अनेक दस्तऐवज, 48 कोरे चेक, हिशेबाच्या 9 वह्यांसह 29 हजार 340 
रुपये रोख पोलिसांच्या हाती लागले आहेत. शुक्रवारी दुपारी सुरु केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर पंढरपूर शहर पोलिसांनी विदुल अधटराव याच्या विरोधात बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबतची माहिती अशी की, संशयित आरोपी विदुल अधटराव याच्या विरोधात बेकायदा सावकारकी करत असल्याबाबतची तक्रार मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी विदुल अधटराव याच्या घरावर पोलिस व निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकून कारवाई केली. 

कारवाई दरम्यान या पथकाला 48 कोरे चेक, हिशेबाच्या 9 वह्या आणि रोख 29 हजार 340 रुपये आढळले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. तपासामध्ये आणखी काही सावकारकीची प्रकरणे समोर येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा : भाजपला पुन्हा मिळाला मैदानात लढणारा नेता 


सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप खैरे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी वैध ठरवला. यामुळे "सोमेश्वर'च्या निवडणुकीतील रंगत कायम राहणार असून भाजपच्या पॅनेलला पुन्हा मैदानात लढणारा नेता मिळणार आहे. 

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक 15 फेब्रुवारीपासून सुरू झाली. ता. 22 फेब्रुवारीपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची 23 तारखेला छाननी झाली. यामध्ये पाच वर्षांपैकी तीन वर्षे ऊस न आलेल्या अनेक सभासदांचे अर्ज बाद झाले. यामध्ये भाजपचे नेते व पुणे बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांच्यासह 94 अर्ज बाद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला होता. सुनावणीनंतरही खैरे यांचा अर्ज फेटाळला. याबाबत खैरे यांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अपिल करत दाद मागितली. यावर सुनावणी होऊन आज दिलीप खैरे यांचा अर्ज मंजूर करण्याचा निर्णय जाहीर केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com