भगिरथ भालकेंनी अजितदादांना यासाठी केला फोन

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.
Bhagirath Bhalke demands Ajit Pawar to set up Kovid Center in Pandharpur-Mangalvedha
Bhagirath Bhalke demands Ajit Pawar to set up Kovid Center in Pandharpur-Mangalvedha

मंगळवेढा (जि. सोलापूर) : वाढलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व्यापारी व नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाला आवश्यक ती औषधोपचाराची साधने व अत्यावश्यक म्हणून आणखी दोन कोविड केअर सेंटर तत्काळ उभी करण्यात यावीत, अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानंतर (स्व.) आमदार भारत भालके यांनी आपल्या आमदार निधीतून जिल्ह्यात सर्वाधिक जास्त खर्च कोरोनाच्या उपाय योजनांसाठी केला होता. सध्या मंगळवेढा तालुक्यात दोन कोविड सेंटर असून वाढत्या रुग्णसंख्या पाहता आणखी दोनशे लोकांची व्यवस्था होईल, असे कोविड सेंटर तत्काळ उभा करण्यात यावे. तसेच, पंढरपूर तालुक्यातही अशीच व्यवस्था करण्याची गरज आहे. दोन्ही तालुक्यात मिळून चारशे लोकांची व्यवस्था होईल असे कोविड केअर सेंटर तत्काळ उभा करण्यात यावे, अशी मागणी भगिरथ भालके यांनी केली आहे. 

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि तत्सम वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केल्याची माहितीही भालके यांनी दिली. 

उपमुख्यमंत्री पवार यांनी पंढरपूर व मंगळवेढा येथे प्राधान्याने सर्व व्यवस्था तत्काळ उभी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती उपाय योजना करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे सांगितले आहे. 

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यक असणारे औषधोपचार वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर निघू नये. तसेच, सातत्याने गर्दी होणाऱ्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक असून मास्क व सनिटायझरचा वापर करणे, 65 वर्षाच्या पुढील व दहा वर्षाच्या आतील व्यक्तींची विशेष काळजी कुटुंबाने घेणे क्रमप्राप्त झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी जात असताना तरुणांनीदेखील मास्कचा वापर करणे बंधनकारक झाले आहे आपल्या परिसरातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे भालके यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com