परिचारक, भालके, आवताडे गटाच्या कार्यकर्त्यांची गावगाड्यातील सत्तेसाठी दोस्ती 

ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी अनेक खेळ्या खेळल्या जात आहेत.
Alliance of Paricharak, Bhalke, Avtade group activists for Gram Panchayat elections
Alliance of Paricharak, Bhalke, Avtade group activists for Gram Panchayat elections

मंगळवेढा : विधानसभेची आगामी पोटनिवडणूक व दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पाहता सध्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. इतर निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात भिडणारे कार्यकर्ते सध्या गावगाड्यातील सत्तेसाठी मात्र दोस्ती करताना दिसत आहेत. ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी अनेक खेळ्या खेळल्या जात आहेत. त्यामुळे निकालाची उत्सुकता असणार आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतींपैकी मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. भोसेमध्ये 10 जागा, सलगर बुद्रूक- 1, हुलजंती-2, डोणज-1, घरनिकी-6, महमदाबाद (शे.)-1, तामदर्डी-5, अरळी-1, मल्लेवाडी-1 असे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. मरवडे, लमाणतांडा, तांडोर, सिद्धापूर, कर्जाळ-कात्राळ, आसबेवाडी, बोराळे, गणेशवाडी, डोणज, हुलजंती, महमदाबाद शे, मल्लेवाडी, नंदेश्वर, लेंडवे चिंचाळे, लवंगी, अरळी, माचणूर, सलगर बुद्रूक, तामदर्डी, मुढवी, घरनिकी, 
भोसे, कचरेवाडी या गावांचा आखाडा सध्या तापू लागला आहे. 

यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण (सलगर बुद्रुक), जिल्हा परिषद सदस्य नितीन नखाते (बोराळे), पंचायत समितीचे सभापती प्रेरणा मासाळ (हुलजंती), पंचायत समिती उपसभापती सुरेश ढोणे (भोसे) या ठिकाणी प्रत्येकी पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण, भोसे येथील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून उद्या (ता. 11 जानेवारी) दुपारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लक्ष असणार आहे. 

मंगळवेढा पंचायत समितीचे सदस्य रमेश भांजे (अरळी), तसेच, तालुक्‍यातील प्रमुख नेत्यांची गावे सिद्धापूर, तांडोर, डोणज, मरवडे, नंदेश्वर, गणेशवाडी, आसबेवाडी, महमदाबाद शे, कचरेवाडी, लवंगी, माचणूर, मल्लेवाडी या गावांत चुरशीच्या लढती आहेत. नदीकाठच्या गावात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात कुस्ती केलेल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यात मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी दोस्ती केली आहे. 

या लढतीत काही गावांत आमदार प्रशांत परिचारक, आमदार (स्व.) भारत भालके, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे गट कार्यरत आहेत. त्यांनी गावपातळीवर परिस्थिती बघून युती केली. यंदा प्रथमच या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने डोणज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहभाग घेतला. इतर ठिकाणी मात्र गावपातळीवर आघाड्या केल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या आघाड्या झाल्या असल्या तरी हे कार्यकर्ते आगामी निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अशा भूमिकेमुळे मतदारांमध्येदेखील नेमकं कोणत्या पॅनेलला विजय करायचं, असा संभ्रम निर्माण होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com