50 crore provision for Sina-Madha Upsa Irrigation Scheme: MLA Babanrao Shinde
50 crore provision for Sina-Madha Upsa Irrigation Scheme: MLA Babanrao Shinde

आमदार बबनदादा शिंदेंनी का मानले अजित पवारांचे आभार? 

काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा.

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : विधिमंडळात सोमवारी (ता. 8 मार्च) सादर झालेल्या अर्थसंकल्पात माढा तालुक्‍यातील सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तशी शिफारस केली होती, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले. 

माढा तालुक्‍यासाठी वरदायिनी ठरलेली सीना-माढा उपसा सिंचन योजना ही कार्यान्वित झालेली आहे. आजपर्यंत जवळपास 12 हजार 500 हेक्‍टर क्षेत्र ओलीताखाली आलेले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे. यामध्ये मुख्य कालवा पाईपलाईन वितरिका पीडीएनद्वारे (बंद नलिका प्रणाली) भिजणारे क्षेत्र आवश्‍यक त्या ठिकाणी पूल आदी कामे झालेली आहेत. 

सीना-माढा योजनेबद्दल आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, या योजनेतील कामे आता अंतिम टप्प्यात आलेली असून प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यांची भेट घेऊन मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने राज्याच्या अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याने या निधीतून राहिलेले पोटफाटे, मुख्य कॅनॉल ज्या ठिकाणी पाझरतात तेथे लायनिंग करणे, नवीन गेट बसविणे, जुन्या गेटच्या दुरुस्त्या, "पीडीएन'मधील उर्वरित कामे ही पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील काळात सीना-माढा योजनेचे उर्वरीत क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. 

या योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात येत असून शेतकऱ्यांनी जमिनाचा मोबदला मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता भीमानागर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे. 

या गावांच्या समावेशासाठी बैठक 

राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना या नियोजनाच्या अभावामुळे बंद पडल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या ताब्यातील सीना-माढा उपसा सिंचन ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन चालविलेली योजना आहे. सुमारे 16 हजार 500 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणणारी ही महत्वकांक्षी योजना असून यामधील आतापर्यंत साडेबारा हजार हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळाल्यामुळे दुष्काळी माढा तालुक्‍याचा कायापालट होण्यास मदत झाली आहे.

उर्वरित चार हजार हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळणेसाठी चालू वर्षी 50 कोटी रुपयांचा निधीची अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानतो.

या योजनेत बावी, तुळशी, अंजनगाव खेलोबा, परितेवाडी या गावांचा समावेश होण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे बैठक होणार आहे, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com