Chagan Bhujbal Entered Belgaum By Changing the Attire in 1982 | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

...इक्बाल शेख? छे! अहो हे तर छगन भुजबळ!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

एक जून १९८६ पासून कर्नाटक सरकारने भागात कन्नडची सक्‍ती लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सीमाभागातले वातावरण चांगलेच पेटले होते. साहजिकच महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. त्यावेळी कर्नाटकच्या पोलिसांना चकवण्यासाठी राज्याचे आजचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चक्क वेषांतर केले होते

बेळगाव : एक जून १९८६ पासून कर्नाटक सरकारने भागात कन्नडची सक्‍ती लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सीमाभागातले वातावरण चांगलेच पेटले होते. साहजिकच महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. त्यावेळी कर्नाटकच्या पोलिसांना चकवण्यासाठी राज्याचे आजचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चक्क वेषांतर केले होते. ते छगन भुजबळ म्हणून नव्हे तर इक्बाल शेख म्हणून बेळगावात दाखल झाले होते.

या घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्येला कन्नड सक्‍ती आंदोलनाची चर्चा सीमाभागात ठिकठिकाणी केली जात आहे. बेळगावात कन्नड सक्तीच्या विरोधात १ जून १९८६ रोजी आंदोलन करण्याचे ठरले होते. साहजिकच महाराष्ट्रातील अनेक नेते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार म्हणून कर्नाटकच्या पोलिसांनी सीमाबंदी केली. प्रत्येकाची कसून चौकशी करुन आणि खात्री करवून घेऊनच प्रवेश दिला जात होता. 

तिकडे महाराष्ट्रातल्या नेत्यांची कोल्हापूरात बैठक झाली. एस. एम. जोशी व शरद पवार यांच्या बैठकीत शरद पवारांनी वेषांतर करुन जावे असे ठरले. त्यानुसार पवार निघाले. दुसरीकडे (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्या शिवसैनिकांना बेळगावकडे जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार छगन भुजबळही बेळगावच्या दिशेने निघाले. 

पोलिसांना चकवण्यासाठी भुजबळ गेले प्रथम गोव्याला. तिथे त्यांनी आपले रंगरुप बदलले. इक्बाल शेख असे नाव धारण करत शोभेशी वेशभूषाही केली. ते ड्रायव्हर सोबत गाडी घेऊन बेळगाव चोर्ला रस्त्याने बेळगावकडे यायला निघाले. त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी जांबोटी जवळ त्यांची गाडी अडवली. ''साहेब 

बेळगाव येत होते यावेळी जांबोटी जवळ पोलिसांनी गाडी अडविली. ''साहेब विदेशी व्यापारी आहेत. त्या निमित्ताने बेळगावला निघाले आहेत,'' अस बहाणा ड्रायव्हरने केला. दिशाभूल झालेल्या पोलिसांनी गाडी सोडली आणि भुजबळ रात्री बेळगावला पोहोचले.  दुसऱ्या दिवशी कितुर राणी चन्नम्मा चौकातील आंदोलनास पवार, भुजबळ यांची उपस्थिती होती. हे आंदोलन यशस्वी झाले. 

एवढा बंदोबस्त करुनही पवार व भुजबळ बेळगावात आले हे पाहून कर्नाटक पोलिसांचे पित्त खवळले. त्याच रागात पोलिसांनी कार्यकर्त्यांसह पवार व भुजबळांवर लाठीमार केला. ही माहिती मिळताच समीमाभागगतले आंदोलन अधिकच तीव्र झाले. या संपूर्ण काळात कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषकांवर प्रचंड अत्याचार केले. शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. यात नऊ कार्यकर्त्यांना हौतात्म्य आले. या सर्व हुतात्म्यांना दरवर्षी १ जून रोजी अभिवादन केले जाते. उद्याही हे अभिवादन केले जाणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख