तानाजी सावंत अॅक्टीव्ह होताच कोठे सक्रीय; तर बरडे गायब  - As soon as MLA Tanaji Sawant became active, district chief Purushottam Barde disappeared | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

तानाजी सावंत अॅक्टीव्ह होताच कोठे सक्रीय; तर बरडे गायब 

प्रमोद बोडके  
शुक्रवार, 14 मे 2021

शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असलेले सोलापूरचे नगरसेवक महेश कोठे यांनी शिवसेनेतील हा बदल तत्काळ स्वीकारला.

सोलापूर : त्यांनी माझ्या आमदारकीचे तिकीट कापले, त्यांच्यामुळे ह्याने बंडखोरी केली, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शिवसेनेची (Shiv Sena) वाटच त्यांनी लावली यांसह अनेक आरोप झेलत सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant ) तब्बल 19 महिन्यांनी अॅक्टीव्ह झाले आहेत. ज्यांनी आमदार सावंत यांना विरोध केला, त्यांच्या विरोधात आरोपांच्या तोफा डागल्या, ते शिवसेनेतील विरोधक मात्र आता अलर्ट झाले आहेत. (As soon as MLA Tanaji Sawant became active, district chief Purushottam Barde disappeared)

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा मतदारसंघातून आमदार होऊनदेखील मंत्रिपदाची संधी हुकल्याने सोलापूरचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी मातोश्रीवर राग व्यक्त केला होता. आमदार तानाजी सावंत हे भविष्यात भाजपमध्ये जातील, अशा शक्‍यताही अनेकांनी बांधल्या होत्या. झालेल्या सर्व घटना विसरुन सावंत हे सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाले आहेत.

बार्शी तालुक्‍यात उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत दिलजमाई झाल्याचा मेसेज दिला. त्यानंतर अवघ्या आठवड्यातच डॉ. सावंत यांनी पंढरपूर, मोहोळ, सोलापूर येथील शिवसेना आणि कोरोनास्थितीचा आढावा घेतला. अनपेक्षितपणे शिवसेना संपर्कप्रमुख सावंत अॅक्टीव्ह झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.

हेही वाचा : भगिरथ भालकेंच्या पराभवाचे अजित पवारांनी सांगितले हे कारण... 

शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असलेले सोलापूरचे नगरसेवक महेश कोठे यांनी शिवसेनेतील हा बदल तत्काळ स्वीकारला. शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात आवर्जून उपस्थित रहात आपण शिवसेनेत आहोत की राष्ट्रवादीत जाणार आहोत? हा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा चर्चेला आणला आहे.

कोरोना संकटात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या समितीत महेश कोठे यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख सावंत यांच्या दौऱ्यात मात्र जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे हे गैरहजर राहिले. बदलत्या राजकारणात बरडे यांची भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यातच राहिली आहे. 

 मनोमिलन कसे होणार?

सोलापूर जिल्ह्यात पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, संभाजी शिंदे आणि धनंजय डिकोळे हे जिल्हा प्रमुख म्हणून सध्या काम पाहत आहेत. शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि बहुतांश जिल्हाप्रमुख यांच्यात मधल्या काळात मतभेद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अॅक्टीव्ह झालेले शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि जिल्ह्यातील चार शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे मनोमिलन कसे होणार? या मनोमिलनासाठी शिवसेनेचा कोणता वरिष्ठ नेता पुढाकार घेणार? यावर शिवसेनेची आगामी वाटचाल अवलंबून आहे. 
 
सोपल, माने, बागल अॅक्टीव्ह होणार का 

तानाजी सावंत यांच्या माध्यमातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री दिलीप सोपल व रश्‍मी बागल हे राष्ट्रवादीतून तर माजी आमदार दिलीप माने हे कॉंग्रेसमधून शिवसेनेत आले. निवडणुकीच्या निकालापासून ते गेल्या 19 महिन्यांच्या कालावधीत बार्शी, करमाळा, शहर मध्यमधील स्थानिक शिवसेना आणि हे सोपल, माने, बागल यांच्यात समन्वय असल्याचे दिसले नाही. शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत ऍक्‍टिव्ह झाल्याने हे तीनही नेते अॅक्टीव्ह होणार की भविष्यातील संधीची वाट बघत शांतच राहणार? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 

शहाजीबापूंचा थेट मातोश्रीशी संपर्क

सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्याची शिवसेना आणि शिवसेनेचे आमदार यामध्ये कुठेही समन्वयक व ताळमेळ आतापर्यंत दिसला नाही. आमदार पाटील हे थेट मातोश्री आणि शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या संपर्कात असल्याने सोलापूर जिल्ह्याला शिवसेनेचा एक आमदार असूनदेखील त्याचा फारसा लाभ जिल्ह्यातील शिवसेनेला होताना दिसत नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख