'हे' मराठी हात साकारणार अयोध्येतला श्रीरामाचा पुतळा

राममंदिराच्या ठिकाणी तब्बल २५१ मीटर लांबीचा प्रभू श्रीरामाचा पुतळा उभारला जाणार आहे. प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार हे या पुतळ्याचं काम पाहणार आहेत.
Sculptor Ram Sutar and Anil Sutar  to Erect Ram Statue in Ayodhya
Sculptor Ram Sutar and Anil Sutar to Erect Ram Statue in Ayodhya

सोलापूर : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या राममंदिर बांधकामाला कांही दिवसात सुरुवात होणार आहे. या राममंदिराच्या ठिकाणी तब्बल २५१ मीटर लांबीचा प्रभू श्रीरामाचा पुतळा उभारला जाणार आहे.  प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार हे या पुतळ्याचं काम पाहणार आहेत. 

साधारण ५१ मीटर उंचीच्या इमारतीवर २०० मीटर उंचीचा प्रभू श्री रामांचा पुतळा उभारला जाणार आहे. यामध्ये प्रभू श्रीराम राजाच्या वेषभूषेमध्ये रत्नजडित पोशाखात असणार आहेत. प्रभू श्रीरामाचा एक पाय दगडावर ठेवलेला,एका हाथामध्ये धनुष्यबाण,दुसऱ्या हाथामध्ये कमान,पाठीवरती बाणांचा अडकवलेला संच,डोक्याच्या मागे दिव्यचक्र,गळ्यामध्ये हार, 
तर डोक्यावरती छत्री असणार आहे. 

हा पुतळा बनवण्यासाठी साधारण ३ वर्षांचा अवधी लागणार आहे तर जवळपास २ ते ३ हजार कारागीर हा पुतळा बनवण्यासाठी राबणार आहेत. या मंदिर परिसरामध्ये अँफी थेटर,म्युझियम,लायब्ररी,मनोरंजनाची साधन,फूड कोर्ट,शरयू नदीमध्ये बोटीची व्यवस्था केली जाणार आहे.प्रभू श्रीरामांचा हा पुतळा भारतातील लोकच बनवणार आहेत,. यामध्ये कुठल्याही बाहेरील देशाची मदत घेतली जाणार नाही, त्यामुळे प्रभू श्रीरामांचा पुतळा 'मेड अँड मेक इन इंडिया' असणार आहे.

सुतार यांनी या अगोदर सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅचू ऑफ युनिटी, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा,बनवलेला आहे. त्याचबरोबर इंदू मिल मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा,अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतारच बनवणार आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com