पक्षाच्या बैठकीसाठी जयंत पाटलांनी घेतली हेलिकाॅप्टरमधून 'लिफ्ट'

सध्या अनेक राज्यांमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणावर राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत केली होती.परंतु, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे मंत्री पाटील यांच्या खासगी हेलिकॉप्टरला उतरण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांचे हेलिकाॅप्टर पंढरपूरकडे वळले
Jayant Patil took Party Meeting at Pandharpur
Jayant Patil took Party Meeting at Pandharpur

पंढरपूर : राजस्थान आणि मध्य प्रदेशात   राजकीय खलबते सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पंढरपुरात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ऐनवेळी ठरलेल्या बैठकीला जयंत पाटील चक्क हेलिकॉप्टरने अवतरले. पंढरपुरात अचानक घेतलेल्या बैठकीचा तपशील मात्र समजू शकला नाही. लिफ्ट मिळाल्याने आपण हेलिकाॅप्टरने पंढरपूरला आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

सध्या अनेक  राज्यांमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणावर राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत केली होती. परंतु, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे मंत्री पाटील यांच्या खासगी हेलिकॉप्टरला उतरण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांचे हेलिकाॅप्टर पंढरपूरकडे वळले.

त्यानंतर त्यांनी तातडीने पंढरपूर येथील शासकीय विश्राम गृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम काका साठे,प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे,आमदार भारत भालके, बबन शिंदे, यशवंत  माने, युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील आदी उपस्थित होते. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकी नंतर उजनी पाणी वापट आणि नियोजना संदर्भात ही अधिकारी आणि आमदारांशी चर्चा  करण्यात आली. 

राष्ट्रवादी, काँगेस आणि शिवसेना युती भक्कम आहे.
चंद्रकात पाटील यांचे आव्हान आम्ही कधी स्विकारण्यास तयार आहोत. त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे असा पलटवार मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.

राजू शेट्टी यांच्या  वीज बिल आंदोलना विषयी विचारले असता,सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शासन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे ही मंत्री पाटील यांनी सांगितले. हेलिकॉप्टर विषयी विचारले असता. हेलिकॉप्टर हे दुसरीकडे चालले होते. मध्येच लिफ्ट मिळाले म्हणून हेलिकाॅप्टरने पंढरपुरात आल्याचे त्यांनी  सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com