शेकापचा का रे दुरावा.... सुनील तटकरे - NCP MP Sunil Tatkare Appeals to Jayant Patil of PWP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शेकापचा का रे दुरावा.... सुनील तटकरे

महेंद्र दुसार
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात भाजपा हाच नंबच एकचा प्रतिस्पर्धी असून आगामी निवडणुकांसाठी त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांचे वारे जिल्ह्यात वाहू लागले आहेत. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पुर्ण तयारीत रिंगणात उतरले आहेत. मात्र, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शेकापकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याची खंत सुनील तटकरे यांनी आपल्या विशिष्ट शैलीत मांडली.

अलिबाग:  राज्यातील महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्ष देखील घटक पक्ष आहे. त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे; परंतु शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील का रागावले आहेत का? हे समजत नाही. शेकापचा हा दुरावा कशासाठी, असा सवाल खासदार सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांना विचारला आहे.

पक्ष संघटन मदबूत करताना महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्येकर्ते यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा ठरावच वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्यामुळे शेकापलाही कोणत्याच प्रकारचा धोका नसल्याचा विश्वास देण्याचा प्रयत्न खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

जिल्ह्यात भाजपा हाच नंबच एकचा प्रतिस्पर्धी असून आगामी निवडणुकांसाठी त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांचे वारे जिल्ह्यात वाहू लागले आहेत. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पुर्ण तयारीत रिंगणात उतरले आहेत. मात्र, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शेकापकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याची खंत सुनील तटकरे यांनी आपल्या विशिष्ट शैलीत मांडली.

'का धरला मजवरी राग'  अशा गीतातून तटकरे यांनी जयंत पाटील हे आपल्यावर रागावले असल्याचे सूचीत केले.  त्याचबरोबर 'का रे हा दुरावा' असे गाणे गात तटकरे यांनी जयंत पाटील यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रुसवे, फुगवे बाजूला सारुन एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. याच वेळेस एकेकाळी विळ्या-भोपळ्याचे वैर असणारे जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यात पुन्हा दुरावा वाढत असल्याची कुणकूण कार्यकर्त्यांमधून ऐकू येत आहे. त्यामुळे तटकरेंच्या एकत्र येण्याच्या आग्रहाला जयंत पाटील किती प्रतिसाद देतात हे आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीतच दिसून येईल.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख