ग्रामपंचायत निवडणुकीने अडगळीत पडलेल्यांना नवसंजीवनी! - Grampanchayat Elections in Maharashtra gave new hope to Political Aspirants | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणुकीने अडगळीत पडलेल्यांना नवसंजीवनी!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

जात, पात, धर्म, अर्थकारण या सर्व बावी ग्रामीण राजकारणावर फोकस करीत असतात. मात्र अनेक वर्षात ग्रामपंचायतींना मजबूत बनविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या असून 15 वित्त आयोगाचा लाखो रुपयांच्या विकास निधीचा वापर थेट ग्रामपंचायत अध्यक्ष व ग्रामपंचायतीच्या हाती दिल्याने ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे.

निपाणी  : राजकीय प्रवाहापासून अलिप्त असलेल्या अनेक स्थानिक नेत्यांना ग्रामपंचायत निवडणुकीने पुन्हा नवसंजीवनी प्राप्त करून दिली आहे. अनेक वर्षांपासून योग्य संधीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना ग्रामीण जनतेने पुन्हा उभारी दिली. त्यामुळे या मंडळींचे राजकीय जीवन पुन्हा रूळावर आल्याचे चित्र निपाणी तालुक्यात दिसून येते. तर दुसरीकडे मतदारांनी अनेक दिग्गजांना धूळसुद्धा चारली. राजकारण म्हणजे बेभरवशाचा खेळ, असे बोलले जाते. त्यातही ग्रामीण भागातील राजकारण तर तारेवरची कसरतच म्हणावी लागेल.

जात, पात, धर्म, अर्थकारण या सर्व बावी ग्रामीण राजकारणावर फोकस करीत असतात. मात्र अनेक वर्षात ग्रामपंचायतींना मजबूत बनविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या असून 15 वित्त आयोगाचा लाखो रुपयांच्या विकास निधीचा वापर थेट ग्रामपंचायत अध्यक्ष व ग्रामपंचायतीच्या हाती दिल्याने ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे साहजिकच ग्रामपंचायतीवर निवडून जाण्यासाठी अनेकांनी पाण्यासारखा पैस ओतला. साम, दाम, दंड, भेद या सर्व उपायांची अंमलबजावणी केली. त्यातून काहींना यश तर अनेकांना अपयश पचवावे लागले.

निपाणी तालुक्यातील ग्रामीण भागात असे अनेक चेहरे आहेत की ज्यांनी जिल्हा, तालुका पचायत समिती निवडणुकीत पराभव पचविला. त्यांना योग्य ती संधी मिळाली नाही. परंतु ग्रामपंचायतच्या निवडणुकीत यापैकी अनेकांनी स्वतः तर अनेकांनी आपल्या अर्धागिनीच्या माध्यमातून मैदान मारले. ग्रामपंचायतच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यात अनेकांना यश आले. दुसरीकडे राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेल्या काहींना मतदारांनी साफ नाकारले. त्यामुळे खऱ्या अर्थान यावेळी सुद्धामतदार हा खरोखरच राजा ठरल्याचे चित्र दिसून येते.

आता लक्ष 'झेडपी '
ग्रामपंचातीच्या निवडणुकीत अपयशी झालेल्या अनेकांनी आता आपले लक्ष येत्या वर्षात होणाऱ्या जिल्हा तसेच तालुका पंचायत समिती निवडणुकीकडे वळविले आहे. ज्या पुढाऱ्यांच्या अर्धागिनी ग्रामपंचायत अध्यक्ष पदी विराजमान झाल्या त्यांनी स्वतः आता झेडपी लडविणारच, असा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख