रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पोतडीतून आज काय बाहेर येणार? 

लॉकडाउनच्या काळात झालेल्या गुंतवणुकीच्या धनवर्षावामुळे चर्चेत आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. 15 जुलै) दुपारी दोन वाजता होत आहे. ही सभा प्रथमच व्हर्च्युअल स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन स्वरूपात होणार आहे
What Mukesh Ambani Will Announce for its investors today
What Mukesh Ambani Will Announce for its investors today

पुणे : लॉकडाउनच्या काळात झालेल्या गुंतवणुकीच्या धनवर्षावामुळे चर्चेत आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. 15 जुलै) दुपारी दोन वाजता होत आहे. ही सभा प्रथमच व्हर्च्युअल स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. मागील वार्षिक सभेचा इतिहास पाहता, याही वर्षी मोठी घोषणा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तमाम गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष लागून आहे. 

सभेची जय्यत तयारी 
- 'कोविड-19'च्या साथीमुळे यंदा प्रत्यक्ष शेअरधारकांच्या (फिजिकल) उपस्थितीत सभा घेता येणार नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. 
- देशा-परदेशातील 500 ठिकाणच्या एक लाखाहून अधिक शेअरधारकांना या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सभेत ऑनलाईन सहभाग घेता येणार. 
- कंपनीकडून +91-79771-11111 या व्हॉट्‌सऍप क्रमांकाच्या माध्यमातून एज्युकेटिव्ह चॅटबॉट सादर. त्याद्वारे लॉग-इन, प्रश्‍न विचारणे आणि ठरावावर मतदान करणे शक्‍य. 
- जिओ मीट आणि सिस्को वेबेक्‍स यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि कमर्शियल वेबकास्ट याही गोष्टी केल्या जाणार. 

मागील घोषणा आणि पूर्तता 
- मार्च 2021 अखेरपर्यंत कंपनी कर्जमुक्त करण्याचा निर्धार 
- प्रत्यक्षात नऊ महिने आधीच उद्दिष्टपूर्ती 
- बहुप्रतिक्षीत गीगा फायबर ब्रॉडबॅंडची घोषणा 

भविष्यात काय होणार? 
- "रिलायन्स'चा फोकस डिजीटल ट्रान्सफॉर्मेशनकडे. 
- भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेत 'जिओ'चा मोठा सहभाग. 
- स्मार्ट नसलेल्या फोनमध्ये इन-बिल्ट जिओची ऍप्लिकेशन असणारा फोन सादर केला जाण्याची शक्‍यता. 
- रिटेल क्षेत्रात जोरदार तयारीसह उतरण्याची शक्‍यता. 

शेअरचे काय होणार? 
- सोमवारी शेअरभाव : 1947 रुपयांच्या विक्रमी पातळीवर. 
- नीचांकी भावापासून वाढ : सुमारे 120 टक्के 
- संपूर्ण बाजाराचा विचार करता, हा तात्पुरता फुगवटा असू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत 
- गुंतवणूक करताना बाजारभाव आणि मूल्यांकन यांचा ताळमेळ घालणे आवश्‍यक 

आकडेवारी काय सांगते? 
- कंपनीवरील मार्च 2020 पर्यंतचे कर्ज : रु. 1,61,035 कोटी 
- "जिओ'तील गुंतवणुकीचा आकडा : रु. 1.18 लाख कोटी (25.24 टक्के). 
- राईट्‌स इश्‍यूच्या माध्यमातून : रु. 53,124 कोटी. 
- ब्रिटीश पेट्रोलियमची गुंतवणूक : रु. 7,000 कोटी 
- आतापर्यंत जमविलेली गुंतवणूक : रु. 1.78 लाख कोटींवर 

लॉकडाऊनच्या काळात धनवर्षाव 
- चालू महिन्यात 'इंटेल कॅपिटल'कडून : रु. 1894.50 कोटी 
- चालू महिन्यात 'क्वॉलकॉम व्हेंचर्स'कडून : रु. 730 कोटी 
- याआधीचे गुंतवणूकदार : फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबादला, एडीआयए, टीपीजी, एल. कॅटरटन, पीआयएफ 
- "गुगल'कडून : 4 अब्ज डॉलर (अंदाजे 30,140 कोटी रुपये) गुंतवणुकीची शक्‍यता. 

कंपनीचे भांडवली मूल्य 
- तब्बल 12 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल नोंदविणारी देशातील पहिलीच कंपनी. 
- मुकेश अंबानी जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती. वॉरन बफे आणि लॅरी पेज यांना मागे टाकले. 
- मुकेश अंबानी यांची मालमत्ता : 72.4 अब्ज डॉलरवर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com