वसंत डावखरे यांचे हिवरे गाव 25 वर्षांनी झाले बिनविरोध ! 

गावची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी, ही संपूर्ण गावकऱ्यांची इच्छा होती.
Vasant Davkhare's Hiware village became unopposed after 25 years
Vasant Davkhare's Hiware village became unopposed after 25 years

शिक्रापूर (जि. पुणे) : विधान परिषदेत तब्बल 17 वर्षे पिठासन अधिकारी राहिलेले दिवंगत वसंतराव डावखरे, आमदार ऍड. निरंजन डावखरे यांचे मूळगाव हिवरे कुंभार (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. एकुण 9 सदस्यांची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी; म्हणून गावाने समन्वयक नेमलेले सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक विकास गायकवाड यांनी पायाला भिंगरी लावून केलेल्या कामाला या निमित्ताने यश आले. 

जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर हिवऱ्यातून 31 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. गावची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी, ही संपूर्ण गावकऱ्यांची इच्छा होती. सुमारे 25 वर्षांपूर्वी दिवंगत माजी सरपंच राजाराम जगताप यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यापुढील काळात दिवंगत डावखरे यांनाही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश आले नव्हते. पण, यंदा गावाने एकमुखाने नेमलेले समन्वयक विकास गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ग्रामपंचायत बिनविरोध झाली. 

याबाबत विकास गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही चार वर्षांपूर्वी गावात सामुदायिक विवाह सोहळा चळवळ सुरू केला. त्याचबरोबर गावचा चौफेर विकास व्हावा; म्हणून प्रयत्न सुरू केले. गावातील प्रत्येक घटकाने त्याला प्रतिसाद दिला. गावातील जगताप, तांबे, गायकवाड, जाधव, शिर्के, साळुंखे, मांदळे, गुंजाळ, टाकळकर आणि डावखरे भावकीतील युवक, ज्येष्ठ गावकारभाऱ्यांसह सर्व बारा बलुतेदारांनीही या वर्षी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्धार केला होता, त्यामुळे गावाच्या प्रयत्नाला यश आले. 31 पैकी केवळ 9 जणांनाच संधी मिळणार असल्याने सर्व इच्छुकांना गावहित लक्षात आणून देण्याबरोबरच ज्या 22 इच्छुकांनी मोठ्या मनाने माघार घेतली. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच गाव आज बिनविरोध निवडणुकीच्या यशापर्यंत पोचले आहे. 

...आणि गुलाल उधळलाच नाही 

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने गावासाठी हा आनंदोत्सव होता. सर्व हेवेदावे-इच्छा आकांक्षा दूर ठेवणाऱ्या 22 इच्छुकांनी माघार घेतल्यामुळेच हे शक्‍य झाले. त्यामुळे गुलाल वा भंडार उधळून आनंदोत्सव साजरा करणे गैर असल्याचे मत युवकांनी मांडले. त्यामुळे ग्रामदैवत श्री मंजनबाबाच्या मंदिरात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत समन्वय विकास गायकवाड यांचा फक्त सत्कार केला. 

बिनविरोध निवडलेले ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य 

अमोल राजाराम जगताप, सोमनाथ कचर आढाळगे, हौसाबाई सीताराम जगताप, शारदा विकास गायकवाड, संध्या दादाभाऊ गायकवाड, विश्वनाथ किसन शिर्के, दीपक सुरेश खैरे, दीपाली दीपक खैरे, नयना जालिंदर मांदळे या नऊ सदस्यांना गावाने बिनविरोध निवडून दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com