....तेव्हा सगळेच कसे लाॅकडाऊन होते? राजू शेट्टींचा निशाणा कुणावर?

राजू शेट्टी हे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा मित्रपक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्यांनी आघाडीसोबत लढवल्या आहेत. पण अलीकडच्या काळात शेट्टी नाराज आहेत. त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते महाआघाडीबाबत नाराजी व्यक्त करतात.
Raju Shetty Targeted Politicialns Through a Poem
Raju Shetty Targeted Politicialns Through a Poem

पुणे-
शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर फेकला.
मजूर पायी चालत गेले.
तेव्हा सगळेच कसे लॉकडाऊन
घराबाहेर कोणी नाही आले.

राजभवन आणि मातोश्रीवर
आता बैठकांच्या फैरी झडताय
सत्तेचा सूर्य झाकळला की
चाणक्यही उंबरे झिजवताय

यासारखी थोडी धडपड
आधी जनतेसाठी केली असती
चिल्ल्यापाल्यांच्या पायावर फोड
आणि शेतीमालाची माती झाली नसती...

...अशी कविता आणि सोबत एका लेकुरवाळ्या महिलेचे चित्र पोस्ट करून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना लक्ष्य केले आहे. राजकीय घडामोडीवर त्यांनी भाष्य केले आहे. राजू शेट्टी यांनी या पोस्टच्या माध्यमातून कोरोनाच्या काळातही राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

मी कवी नाही पण कधी कधी चुकीच्या गोष्टी पाहून माझ्यातील कवी जागा होतो."अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. जेव्हा शेतकरी त्यांनी कष्ठाने पिकवलेला माल रस्त्यावर फेकत होते. मजूर उन्हातान्हात  छोटी मूलं खांद्यावर घेऊन रस्त्याने चालत निघाले होते, तेव्हा सगळेच कसे लॉकडाऊन होते? असा प्रश्न त्यानी उपस्थित केला आहे.

महाआघाडीवरची नाराजी?

राजू शेट्टी हे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा मित्रपक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्यांनी आघाडीसोबत  लढवल्या आहेत. पण अलीकडच्या काळात शेट्टी नाराज आहेत. त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते महाआघाडीबाबत नाराजी व्यक्त करतात.

राजू शेट्टी यांनी आज सकाळी त्यांच्या पेजवरून  टीकात्मक कविता सादर केली आहे. त्यांना कवितेतून नेमके कोणाला लक्ष्य करायचे आहे याबाबत चर्चा सुरू आहे. मी कवी नाही पण अस्वस्थ झालो की माझ्यातला कवी जागा होतो.मला दिसलं ते वर्तमान मी मांडले आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com